Bank of India Q3 profit up 12%: बँक ऑफ इंडियाने (Bank Of India) नुकतेच चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील या महत्त्वाच्या बँकेच्या नफ्यात तिसऱ्या तिमाहीत 12 टक्क्यांनी वाढ झाली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या काळात बँकेच्या बुडीत कर्जात (Gross non-performing loans) घट झाली आहे. संपूर्ण आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये पत वाढ (Credit increase) 11 ते 12 टक्क्यांच्या दरम्यान राहण्याची अपेक्षा बँकेने केली आहे.
ऑपरेटिंग नफ्यात 74% वाढ (74% increase in operating profit)
मंगळवारी, 18 जानेवारी रोजी जाहीर झालेल्या निकालांनुसार, ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 दरम्यान, बँक ऑफ इंडियाचा निव्वळ नफा 12 टक्क्यांनी वाढून 1 हजार 151 कोटी रुपये झाला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत बँकेने 1 हजार 27 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता. याच कालावधीत बँकेचा ऑपरेटिंग नफा 74 टक्क्यांनी वाढून 3 हजार 652 कोटी झाला आहे, जो मागील वर्षी याच तिमाहीत 2 हजार 96 कोटी होता. बँकेचे एकूण उत्पन्न चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत वाढून 14 हजार 159.60 कोटी झाले आहे, जे मागील वर्षी याच कालावधीत 11 हजार 211.14 कोटी होते.
निव्वळ व्याज उत्पन्न 64% ने वाढले (Net interest income increase)
बँक ऑफ इंडियाचे निव्वळ व्याज उत्पन्न देखील 2022-23 च्या आर्थिक वर्षाच्या तिसर्या तिमाहीत (Q3FY23) 64 टक्क्यांनी वाढून 5 हजार 596 कोटी रुपये झाले, जे मागील आर्थिक वर्षाच्या (Q3FY22) याच तिमाहीत 3 हजार 408 कोटी रुपये होते. बँक ऑफ इंडियाच्या व्यवस्थापनाने 2022-23 या संपूर्ण आर्थिक वर्षात पत वाढ 11 ते 12 टक्क्यांच्या दरम्यान राहण्याची अपेक्षा केली आहे.
मालमत्तेच्या गुणवत्तेत सुधारणा (Improvement in asset quality)
बँक ऑफ इंडियाची कामगिरी मालमत्तेच्या गुणवत्तेच्या बाबतीतही सुधारली आहे आणि तिची बुडीत कर्जे 10 टक्क्यांपेक्षा कमी झाली आहेत. मंगळवारी, 17 जानेवारी रोजी जाहीर झालेल्या निकालांनुसार, ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 दरम्यान, बँकेची एकूण नॉन-परफॉर्मिंग अॅसेट (Gross NPA: Gross Non-performing Asset) 7.66 टक्क्यांवर घसरली. मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत बँकेचा एकूण NPA 10.46 टक्के होता. याच कालावधीत बँकेचा निव्वळ एनपीए 2.66 टक्क्यांवरून 1.61 टक्क्यांवर आला आहे. डिसेंबर 2022 ला संपलेल्या तिमाहीत, बँकेचे भांडवल पर्याप्तता प्रमाण (CAR: capital adequacy ratio) 15.50 टक्के नोंदवले गेले आहे.