Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Bank Of England Hikes Rates: महागाई रोखण्यासाठी बँक ऑफ इंग्लंडने व्याजदरात केली वाढ, RBI वर दबाव वाढला

Bank of England

Image Source : www.dailysabah.com

Bank Of England Hikes Rates: बुधवारी फेड रिझर्व्ह बँकेने त्यांच्या व्याजदरात वाढ केल्यानंतर लगेच गुरुवारी बँक ऑफ इंग्लंडने(Bank Of England) व्याजदरात वाढ केली आहे. त्यामुळे आता सर्वांची नजर RBI कडे लागली आहे.

Bank Of England Hikes Rates: बुधवारी यूएस सेंट्रल बँक फेडरल रिझर्व्हने व्याजदर एक चतुर्थांश टक्क्यांनी वाढवला आहे. यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी बँक ऑफ इंग्लंडनेही (Bank Of England) महागाईला आळा घालण्यासाठी व्याजदर वाढवण्याची घोषणा केली आहे. बँक ऑफ इंग्लंडने व्याजदर 0.50 टक्क्यांनी वाढवून आता 4 टक्के केला आहे. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष RBI काय निर्णय घेईल, याकडे लागले आहे. चला तर याबद्दल जाणून घेऊयात.

Bank Of England ने व्याजदर वाढवला

कोरोना महामारी आणि रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर बँक ऑफ इंग्लंडच्या चलनविषयक धोरण समितीने सलग दहाव्यांदा व्याजदरात वाढ केली आहे. किंबहुना, तेथील महागाई 40 वर्षांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचली आहे, त्यानंतर बँक ऑफ इंग्लंडला(Bank Of England) व्याजदर वाढवण्याचा निर्णय घ्यावा लागला. यूकेमध्ये, डिसेंबर 2022 मध्ये चलनवाढीचा दर दुहेरी अंकांमध्ये 10.5 टक्के होता. बुधवारी अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हनेही महागाईला आळा घालण्यासाठी व्याजदर एक चतुर्थांश टक्क्यांनी वाढवले आहे. खरं तर, रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यापासून, खाद्यपदार्थांपासून ते पेट्रोलियम पदार्थ आणि गॅसच्या किमतींमध्ये प्रचंड वाढ झाली आहे, त्यामुळे महागाई वाढली आहे.

RBI काय करणार?

जगातील मोठ्या केंद्रीय बँका पतधोरणाच्या बैठकीत व्याजदर वाढवत आहेत. त्यामुळे आता या दबावाखाली आरबीआय(RBI) पॉलिसी दरांमध्येही बदल करू शकते, असे मानले जात आहे. RBI ची पतधोरण बैठक 5 ते 7 फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. 7 फेब्रुवारी रोजी RBI गव्हर्नर शक्तीकांत दास हे चलनविषयक धोरण समितीचे निर्णय जाहीर करतील. ज्यामध्ये असे मानले जाते की, आरबीआय रेपो दरात 25 बेस पॉइंट्स म्हणजेच एक चतुर्थांश टक्के वाढ करू शकते. त्यानंतर रेपो दर 6.25 टक्क्यांवरून 6.50 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो.

रेपो रेट 25 बेसिस पॉईंटने वाढू शकतो

यापूर्वी समितीच्या बैठकीत आरबीआयने रेपो दरात 2.25 टक्के वाढ केली आहे आणि रेपो दर 4 टक्क्यांवरून 6.25 टक्के केला आहे. पण डिसेंबर महिन्यात रिटेल चलनवाढीचा दर आरबीआयच्या 6 टक्के ते 5.72 टक्क्यांच्या खाली आला आहे. त्यामुळे या वेळी केवळ 25 बेसिस पॉइंट्स रेपो रेट वाढेल अशी अपेक्षा आहे. मात्र, असे झाल्यास गृहकर्ज घेतलेल्या ग्राहकांचा ईएमआय(EMI) पुन्हा महाग होऊ शकतो.