• 28 Nov, 2022 18:05

Bank of England Rate Hike : बँक ऑफ इंग्लंडने केली तीन दशकातील मोठी व्याजदरवाढ

Bank of England, Bank of England rate hike

Bank of England Rate Hike : ब्रिटनमधील महागाई नियंत्रणात येत नसल्याने बँकेला व्याजदर वाढवण्याशिवाय पर्याय नाही. मागील दोन वर्षांपासून इंग्लंडला मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.

बँक ऑफ इंग्लंडने  (BoE) गुरुवारी व्याजदरात 0.75% ने वाढवून तो 3 % इतका केला. ब्रिटनमधील वाढती महागाई आणि मंदीच्या पार्श्वभूमीवर बँकेने केलेली मागील 30 वर्षांतील ही सर्वात मोठी व्याजदर वाढ ठरली. ब्रिटनमधील महागाई नियंत्रणात येत नसल्याने बँकेला व्याजदर वाढवण्याशिवाय पर्याय नाही. मागील दोन वर्षांपासून इंग्लंडला मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.

महागाई दर 11% वाढला 

बँक ऑफ इंग्लंडच्या (BoE) अंदाजानुसार  चालू तिमाहीत चलनवाढीचा दर 40 वर्षांच्या उच्चांकी 11% पर्यंत जाऊ शकतो. या सर्व आर्थिक घडामोडीवरून ब्रिटीश अर्थव्यवस्थेने आधीच मंदीमध्ये प्रवेश केला असून ही मंदी  दोन वर्षे टिकू शकेल, असा अंदाज अर्थतज्ञानी व्यक्त केला आहे. 2008-09. आर्थिक संकटापेक्षा हा जास्त काळ आहे. बँक ऑफ इंग्लंडने दोन आठवड्यापूर्वीच 0.50% व्याजदर वाढवला होता. आता 0.75% दरवाढ  केली आहे. 1989 नंतरची सर्वात मोठी दरवाढ ठरली आहे.

BoE का घेतेय व्याजदरवाढीचा निर्णय?

इंग्लंडमधील नव्या सरकारचे प्रथम प्राधान्य हे महागाईवर नियंत्रण ठेवण्याचे आहे. त्यातून व्याजदर वाढीचे निर्णय घेतले जात आहेत. ब्रिटनमध्ये चलनवाढ 10% वर गेली आहे. ही १९८२ नंतरच्या गेल्या काही दिवसात ही स्थिती गाठली आहे.  बँक ऑफ इंग्लंडकडून निर्धारित दोन टक्के महागाई दराच्या लक्ष्यापेक्षा पाच पट अधिक आहे.ब्रिटनमधील महागाई दर चालू वर्षांच्या अखेरीस 13.1% पोहोचेल आणि दीर्घकालीन मंदीला सुरुवात होईल, असा इशारा मध्यवर्ती बँकेने (BoE) महिन्याभरापूर्वीच दिला होता.

डॉलरच्या तुलनेत पाऊंड घसरतोय

युकेचे चलन ब्रिटिश पौंड डॉलरच्या तुलनेत नीचांकी पातळीवर घसरला आहे. फेडरल रिझर्व्हच्या कठोर पतधोरणांचा फायदा डॉलरला होत आहे. डॉलर इंडेक्स वाढला असून त्याचे मूल्य इतर चलनांच्या दृष्टीने वधारल आहे. याचा फटका युरोप आणि आशियातील अनेक देशांना बसला आहे. जगभरातील बहुतांश व्यापारासाठी डॉलरचा वापर केला जातो. त्यामुळे डॉलर महाग होत असल्याने या देशांना आयातीसाठी जादा खर्च करावा लागेल.