• 07 Dec, 2022 09:56

MCLR Hike : बँक ऑफ बडोदा आणि युनियन बँकेची कर्जे महागली

MCLR Hike, Bank of Baroda, Home Loan

Bank of Baroda and Union bank of India hike MCLR :बँक ऑफ बडोदाने एमसीएलआरमध्ये 0.15 % वाढ केली आहे. याचा विविध प्रकारच्या कर्जदारांवर परिणाम होणार आहे. त्यांना अधिक ईएमआय भरावा लागणार आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील युनियन बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ बडोदाने कर्जदरात (एमसीएलआर) वाढ केली आहे. यामुळे गृहकर्ज, वाहन कर्ज तसेच वैयक्तिक कर्जे महागणार आहेत. त्याशिवाय ज्या कर्जदारांनी बदलत्या व्याजदरानुसार कर्ज घेतली आहेत अशांचा  मासिक हप्ता (ईएमआय) वाढणार आहे.

बँक ऑफ बडोदाने एमसीएलआरमध्ये 0.15 % वाढ केली आहे. याचा विविध प्रकारच्या कर्जदारांवर परिणाम होणार आहे. त्यांना अधिक ईएमआय भरावा लागणार आहे. यामध्ये होम लोन, पर्सनल लोन, ऑटो लोन, कार लोन यांचा समावेश आहे.

एमसीएलआरचा सुधारित व्याजदराला 9 नोव्हेंबर 2022 रोजी मंजुरी दिल्याचे बँक ऑफ बडोदाने म्हटले आहे. बँकेने एका वर्षासाठी एमसीएलआरमध्ये 10 बेसिस पॉईंटची वाढ केली आहे. यामुळे एमसीएलआर वाढून आता 8.05 %इतका झाला आहे. 12 नोव्हेंबरपासून हे नवे दर लागू होतील. एक दिवसासाठीचा एमसीएलआर 7.25%, एक महिना एमसीएलआर 7.70 %, 3 महिन्यासाठी 7.75 %, 6 महिन्यासाठी 7.95 % इतका झाला आहे.

कोणावर परिणाम होणार?

या प्रकारची कर्जे सामान्यपणे कार लोन, ऑटो लोन या प्रकारची असतात. फ्लोटिंग रेट कर्जदारांना यामुळे वाढीव ईएमआयसाठी पैशांची तरतूद करावी लागेल.  नव्याने कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना आता जादा दराने कर्ज घ्यावे लागेल.

युनियन बँक ऑफ इंडियाची दरवाढ

युनियन बँक ऑफ इंडियाचा ओवरनाईट एमसीएलआर आता 7.15% वरून 7.45 % इतका झाला आहे. एक महिना, 3 महिने आणि 6 महिने कालावधीसाठी अनुक्रमे 7.60%, 7.80% आणि 8% इतका असेल. एक वर्ष  2 वर्षे आणि 3 वर्षासाठी अनुक्रमे 8.20%, 8.40% आणि 8.55 % इतका असेल.

एमसीएलआर म्हणजे काय? What is MCLR

MCLR म्हणजे marginal costs of funds based lending rate.  मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस लेंडिंग रेट (MCLR) हा बॅंकांचा किमान कर्ज दर आहे. आरबीआयने (RBI) 1 एप्रिल, 2016 रोजी MCLR ही प्रणाली लागू केली. बॅंका कर्जावर किती व्याजदर आकारू शकतात, हे निर्धारित करण्यासाठी ही प्रणाली ठरवण्यात आली.