Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Bank Nifty : बँक निफ्टीचा रेकॉर्ड, बँकांच्या शेअर्सला गुंतवणूकदारांची मिळतेय पसंती

Bank Nifty

Bank Nifty Hits Record High: महागाईचा भडका, औद्योगिक उत्पादनात घट, केंद्रीय बँकेची व्याज दरवाढ याकडे दुर्लक्ष करत गुंतवणूकदारांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचा ओघ कायम ठेवला आहे. गेल्या आठवड्यात सेन्सेक्स 60,000 अंकांवर आणि निफ्टी 18,000 अंकावर गेला होता. आज बँक निफ्टीने नवा विक्रमी टप्पा गाठला.

शेअर मार्केटमधील तेजीच्या लाटेत बँकांचे शेअर स्वार झाले आहेत. बँकिंग शेअर्समध्ये गुंतवणुकीचा ओघ मोठ्या प्रमाणात वाढला आहे. परिणामी बँक इंडेक्सने मोठी झेप घेतली आहे. आज गुरुवारी 15 सप्टेंबर 2022 रोजी 'बँक निफ्टी' या निर्देशांकाने 1% झेप घेत 41,840 अंकांची विक्रमी पातळी गाठली. बँक शेअर्सची  दमदार कामगिरी आणि परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांमुळे (FII) बँक निफ्टीने रेकॉर्ड स्तर गाठला. नुकताच बेंचमार्क निफ्टीने 18,000 अंकांचा ऐतिहासिक टप्पा पार केला होता.

आज सकाळी 10 वाजता बँक निफ्टी 0.33% वाढीसह 41,542 अंकांवर पोहोचला. त्यानंतर तो 41,840 अंकांपर्यंत पोहोचला. या तेजीत आयसीआयसीआय बँक, बंधन बँक, आयडीएफसी बँक या शेअरमध्ये 1% ते 2.5% वाढ झाली. बँक निफ्टीला 42,000 अकांचा टप्पा खुणावत आहे. सध्या बाजारात आयटी कंपन्यांचे शेअर्स निगेटिव्ह झोनमध्ये आहेत. त्यामुळे आयटी शेअर ऐवजी बँकांच्या शेअरला गुंतवणूकदार पसंती देत आहेत. विशेषत: परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी बँकिंग शेअर्समधील गुंतवणूक प्रमाण वाढल्याचे आकडेवारीवरुन दिसून येते.

बँकांच्या शेअर्समधील ट्रेडिंग व्हॉल्यूम वाढला आहे. नजिकच्या काळात बँक निफ्टी 42,500 अंकांवर जाईल, असा अंदाज शेअर मार्केट तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. बँक निफ्टीत आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक, आयडीएफसी फर्स्ट बँक,  युनियन बँक,  एचडीएफसी बँक, अॅक्सिस बँक, एसबीआय, फेडरल बँक या शेअरबाबत शेअर मार्केट विश्लेषक सकारात्मक आहेत.

nifty-bank-share.png

अर्थव्यवस्था सावरली, बँकांना मिळाले बूस्टर

अर्थव्यवस्था कोव्हीड संकटातून सावरली आहे. दरमहा जीएसटी महसूल वाढत असल्याने एक सकारात्मक वातावरण तयार झाले आहे. बँकांचे कर्ज वितरण आणि ठेवी यांच्यामध्ये वाढ होत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील भूराजकीय संघर्ष, देशांतर्गत महागाई या घटकांकडे गुंतवणूकदारांनी कानाडोळा केला असून शेअर मार्केटमधील गुंतवणुकीचा धडाका त्यांनी कायम ठेवला आहे.

या कारणांमुळे बँक शेअरमध्ये तेजी

  • कोरोनाचे संकट कमी झाले. मागील सहा महिन्यांत बँकिंग व्यवसाय रुळावर आला. प्रमुख बँकांना NPA कमी करण्यात यश. 
  • बँकांकडून डिजिटल सेवांमध्ये मोठी गुंतवणूक करण्यात येत आहे. बँकांनी डिजिटल सेवांमध्ये विस्ताराला प्राधान्य दिले. 
  • रिझर्व्ह बँकेच्या अहवालानुसार बँकांची क्रेडिट ग्रोथ 15.5% वाढण्याचा अंदाज आहे. हा घटक तेजीसाठी कारणीभूत ठरला आहे. 
  • 'RBI'च्या रेपो दरवाढीनंतर बँकांकडून व्याजदर वाढीचे अनुकरण, यामुळे बँकांची उत्पन्नाची बाजू सुधारणार, ताळेबंद मजबूत होईल.
  • परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी बँकिंग शेअर्समधील गुंतवणूक प्रमाण वाढवले आहे.