बँक ग्राहाकांना पुढच्या महिन्यात बँकेत जाण्यापूर्वी नियोजन करावे लागणार आहे. कारण जानेवारी 2023 मध्ये बँकांना तब्बल 14 दिवस सुट्टी आहे. यात दुसरा आणि चौथा शनिवार आणि रविवार यांचा समावेश आहे. जवळपास निम्मा महिना बँकांचे कामकाज बंद राहणार आहे. याकाळात ग्राहकांना ऑनलाईन बँकिंग आणि एटीएमचा आधार घेता येईल.
जानेवारी महिन्यात सार्वजनिक सुट्ट्या आणि दुसरा आणि चौथा शनिवार असे एकूण 14 दिवस बँकांचे कामकाज बंद राहणार आहे. वर्ष 2023 चा पहिलाच दिवस रविवार असल्याने बँकांना साप्ताहिक सुट्टी असेल. त्याशिवाय गुरु गोविंद सिंग जयंती, मिशनरी डे, स्वामी विवेकानंद जयंती, मकर संक्रांती, पोंगल, प्रजासत्ताक दिन या दिवशी राष्ट्रीय सण आणि उत्सवानिमित्त बँकांनी त्या त्या क्षेत्रानुसार सुट्टी असेल.
2 जानेवारी रोजी मिझोरममधील बँकांना सुट्टी असेल. 5 जानेवारी रोजी गुरु गोविंद सिंग जयंतीनिमित्ती बँकांना सुट्टी असेल. 8 जानेवारी रोजी रविवारी साप्ताहिक सुट्टीने बँका बंद राहतील. 11 जानेवारी रोजी मिशनरी डे निमित्त मिझोरममधील बँकांना सुट्टी असेल. 12 जानेवारी रोजी स्वामी विवेकानंद जयंती निमित्त पश्चिम बंगालमध्ये बँकांना सार्वजनिक सुट्टी असेल.
14 जानेवारी रोजी मकर संक्रातींनिमित्त कर्नाटक, आसाम, तेलंगणा या राज्यात बँका बंद राहतील. 15 जानेवारी रोजी पोंगल सणानिमित्त आंध्र प्रदेश, तेलंगाणा आणि तामिळनाडु या राज्यात बँकांना सुट्टी असेल. 16 जानेवारी रोजी आंध्र आणि तामिळनाडुमध्ये बँकांना रजा असेल.
सिक्किममध्ये स्थानिक पातळीवर बँकांना 22 जानेवारी रोजी सुट्टी असेल. 23 जानेवारी रोजी सुभाष चंद्र बोस यांच्या जयंती निमित्त आसाममध्ये बँकांना सुट्टी असेल. 25 जानेवारी रोजी राज्य दिवसनिमित्त हिमाचल प्रदेशातील बँकां बंद राहतील. 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त बँकांना सुट्टी असेल. 28 जानेवारी रोजी चौथा शनिवार आणि 29 जानेवारी रोजी रविवारी बँकांचे कामकाज बंद राहील. 31 जानेवारी रोजी आसाममध्ये बँकांना सुट्टी राहील.