Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Bank Fixed Deposit scheme: 30 जूनपूर्वी 'या' मुदत ठेवींमध्ये करा गुंतवणूक, मिळेल सर्वाधिक परतावा

Bank Fixed Deposit scheme

Image Source : www.bankofbaroda.in

Bank Fixed Deposit scheme: आर्थिक गुंतवणुकीसाठी सुरक्षित पर्याय म्हणून बँकेतील मुदत ठेवींकडे (Fixed Deposit scheme) पाहिले जाते. काही बँकांनी ठराविक कालावधीसाठी खास मुदत ठेव योजना काढल्या आहेत. ज्यामध्ये गुंतवणूक करण्याची अंतिम तारीख 30 जून 2023 असणार आहे. या मुदत ठेवीमध्ये गुंतवणूक केल्यावर सर्वाधिक परतावा मिळणार आहे. कोणत्या आहेत, त्या योजना जाणून घेऊयात.

पारंपरिक गुंतवणुकीची पद्धत म्हणून आपण बँकेतील मुदत ठेवीकडे (Fixed Deposit scheme) पाहतो. ही गुंतवणूक अधिक सुरक्षित मानली जाते. त्यामुळेच अनेकांचा कल हा मुदत ठेवीमध्ये गुंतवणूक करण्याकडे पाहायला मिळतो. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) मे 2022 नंतर सहा वेळा रेपो दरात (Repo Rate) वाढ केली. ही वाढ 250 बेसिस पॉइंटने करण्यात आली होती. या रेपो दराच्या वाढीनंतर अनेक सरकारी आणि खासगी बँकांनी त्यांच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली.

आज आम्ही तुम्हाला अशा काही मुदत ठेवींबाबत माहिती देणार आहोत, ज्यामध्ये 30 जून 2023 पूर्वी गुंतवणूक केली, तर गुंतवणूकदाराला सर्वाधिक परतावा मिळेल. या बँकेने निश्चित कालावधीसाठी सुरू केलेल्या मुदत ठेव योजना आहेत. कोणत्या आहेत, त्या योजना जाणून घेऊयात.

30 जून 2023 पूर्वी 'या' बँकेच्या मुदत ठेवीत करा गुंतवणूक

एसबीआय वी केअर (SBI We Care FD Scheme)

देशातील सर्वात मोठी सरकारी स्टेट बँक ऑफ इंडियाने खास ज्येष्ठ नागरिकांसाठी एसबीआय वी केअर मुदत ठेव योजना (SBI We Care FD Scheme) सुरू केली आहे. ही योजना केवळ ज्येष्ठ नागरिकांसाठी (Senior Citizens) आहे. या योजनेत 5 ते 10 वर्षासाठी गुंतवणूक करता येते आणि सर्वाधिक परतावा मिळवता येतो.

यातील गुंतवणुकीवर ज्येष्ठ नागरिकांना 7.50% व्याजदर देण्यात येत आहे. एसबीआयच्या या मुदत ठेव योजनेत 30 जून 2023 पर्यंतच गुंतवणूक करता येऊ शकते. त्यामुळे तुम्हाला जर गुंतवणूक करायची असेल, तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.

एसबीआय अमृत कलश योजना (SBI Amrit Kalash Scheme)

भारतीय स्टेट बँकेची अमृत कलश मुदत ठेव योजना (SBI Amrit Kalash Scheme) आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. ही एक रिटेल टर्म डिपॉझिट योजना आहे. या योजनेत 400 दिवसांसाठी गुंतवणूक करता येते. ज्यामध्ये सर्वसामान्य लोक आणि ज्येष्ठ नागरिक दोघेही गुंतवणूक करू शकतात. ज्येष्ठ नागरिकांना बँकेकडून 7.60% व्याजदर देण्यात येत आहे, तर सामान्य नागरिकांना 7.10% व्याज मिळणार आहे. या योजनेत गुंतवणूक करण्याची अंतिम तारीख 30 जून 2023 असणार आहे.

इंड सुपर 400 डेज (Ind Super 400 Days)

खासगी क्षेत्रातील नामांकित इंडियन बँकेने आपल्या ग्राहकांसाठी खास मुदत ठेव योजना काढली आहे. या योजनेचे नाव आहे, 'इंड सुपर 400 डेज' (Ind Super 400 Days).या मुदत ठेवीमध्ये देखील ग्राहक 400 दिवसांच्या कालावधीसाठी सर्वोत्तम व्याजदर देत आहेत. बँक सर्वसामान्य ग्राहकांना यातील गुंतवणुकीवर 7.25% व्याजदर देत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना 7.75% व्याज देत आहे. या मुदत ठेवीत ग्राहक 30 जून 2023 पर्यंत गुंतवणूक करू शकतात आणि सर्वाधिक परतावा मिळवू शकतात.

Source: hindi.moneycontrol.com