Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Bank FD Rates: पंजाब अँड सिंध बँकेने मुदत ठेवींवरील व्याजदरात केला फेरबदल, जाणून घ्या नवे व्याजदर

Punjab & Sind Bank FD Rate

Bank FD Rates: खासगी क्षेत्रातील पंजाब अँड सिंध बँकेने (Punjab and Sind Bank) त्यांच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात फेरबदल केला आहे. हे नवीन बदल 1 जुलै 2023 पासून लागू करण्यात आले आहेत. तुम्हीही मुदत ठेव योजनेत गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर बँकेचे नवीन व्याजदर जाणून घ्या.

देशातील खासगी क्षेत्रातील पंजाब अँड सिंध बँकेने (Punjab and Sind Bank) आपल्या ग्राहकांना आनंदाची बातमी दिली आहे. बँकेने  मुदत ठेवींवरील (FD) व्याजदरात फेरबदल केले आहेत. 2 कोटींपेक्षा कमी रकमेच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात हे बदल करण्यात आले आहेत. ज्याचा गुंतवणूक कालावधी 7 दिवसापासून ते 10 वर्षापर्यंतचा आहे. बँक ग्राहकांना मुदत ठेवीवर 2.80 टक्के ते 7.10 टक्के व्याजदर देत आहे. बँकेचे नवीन व्याजदर 1 जुलै 2023 पासून लागू करण्यात आले आहेत. जर तुम्हीही पंजाब अँड सिंध बँकेमध्ये मुदत ठेव करण्याचा विचार करत असाल, तर नवीन व्याजदर जाणून घ्या.

7 दिवस ते 179 दिवसांमधील गुंतवणुकीवर मिळणार इतका व्याजदर

पंजाब अँड सिंध बँक (Punjab and Sind Bank) ग्राहकांना 7 दिवस ते 30 दिवसांच्या मुदत ठेवीवर (FD) 2.80% व्याजदर देणार आहेत. तर 31 दिवस ते 45 दिवसांच्या मुदत ठेवीवर ग्राहकांना 3% व्याज मिळणार आहे. तसेच 46 दिवस ते 90 दिवसांच्या मुदत ठेवीवर ग्राहकांना 4.60% व्याज आणि 91 दिवस ते 179 दिवसांच्या गुंतवणुकीवर 4.75 % व्याजदर देण्यात येत आहे.

विशेष मुदत ठेवीवर मिळतोय ‘इतका’ व्याजदर

पंजाब अँड सिंध बँक (Punjab and Sind Bank) 180 दिवस ते 364 दिवसांच्या कालावधीसाठी 6% व्याजदर देणार आहे. तर 1 वर्ष ते 399 दिवसांच्या मुदतीच्या ठेवींवर सध्या 6.40% व्याज मिळत आहे. पंजाब अँड सिंध बँक 400 दिवसांची विशेष मुदत ठेव योजना (Special FD Scheme) राबवत आहे. या योजनेत 7.10% व्याज देण्यात येत आहे. विशेष मुदत ठेवीवरील व्याजदर हा 30 सप्टेंबर 2023 पर्यंतच वैध असणार आहे.

त्याचप्रमाणे 401 दिवस ते 554 दिवसांच्या मुदत ठेवींवर 6.40% व्याज देण्यात येत आहे. 555 दिवसांत मॅच्युअर होणाऱ्या मुदत ठेवींवर सर्वाधिक 7.35% व्याज दिले जाणार आहे. तर 556 दिवस ते 600 दिवसांच्या ठेवीवर 6.40% व्याजदर मिळणार आहे.

ज्येष्ठ नागरिकांना मिळणार 0.50 टक्के जास्त व्याजदर

पंजाब अँड सिंध बँकेने 1 जुलै 2023 पासून नवे व्याजदर लागू केले आहेत. सर्वसामान्य नागरिकांना मिळणारा व्याजदरावर नमूद करण्यात आला आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना वरील कालावधीतील मुदत ठेवीवरील गुंतवणुकीसाठी बँक 0. 50 % जास्त व्याजदर देणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना बँक 3.30% ते 7.60 % व्याज देणार आहे. तसेच 80 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना 0.15% जास्त व्याजदर मिळणार आहे.

Source: economictimes.com