Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Cigarette Lighters Ban: सिगारेट पिणाऱ्यांना दणका, चायनीच पॉकेट लायटरच्या आयातीवर बंदी

Cigarette Lighters Ban: सिगारेट पिणाऱ्यांना दणका, चायनीच पॉकेट लायटरच्या आयातीवर बंदी

Cigarette Lighters Ban: सिगारेट पिणाऱ्यांना सरकारनं मोठा झटका दिला आहे. 50 हजार रुपयांच्या चायनीज सिगारेट लायटरच्या आयातीवर बंदी घालण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे सिगारेट व्यसनींना मोठा फटका बसला आहे. यासंदर्भात सरकारनं अधिसूचनादेखील जारी केली आहे.

देशात अमली पदार्थांचं व्यसन करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारनं 20 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या लायटरच्या आयातीवर बंदी घातली आहे. यासंदर्भात सरकारतर्फे अधिसूचना जारी करण्यात आली आहे. 20 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या लायटर्सवर बंदी घालावी, असं यात म्हटलं आहे.

स्टॅलिनं यांनी लिहिलं होतं पत्र

2022मध्ये तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी सरकारला पत्र लिहिलं होतं. पर्यावरणाच्या रक्षणासाठी सिंगल यूज प्लास्टिक लायटर्सवर बंदी घालण्यात यावी, असं त्यांनी पत्रात म्हटलं होतं. दक्षिण भारतात बहुतेक लोक माचिस म्हणजेच काडेपेटी बनवून आपला उदरनिर्वाह करतात. अशा सिंगल यूज प्लास्टिक लायटरवर बंदी घातली तर दक्षिण भारतातल्या माचिस कामगारांना फायदा होईल. त्यांनी सांगितलं, की माचिसमधून मोठ्या प्रमाणात परकीय चलन उत्पन्न होतं.

केंद्र सरकारचे मानले आभार 

सिगारेट लायटर्सवर बंदी घातल्यानंतर स्टॅलिन यांनी पीयूष गोयल यांचे आभार मानले आहेत. आमच्या समस्येकडे लक्ष दिल्याबद्दल आणि सिगारेट लायटर्सच्या आयातीवर बंदी घालण्यासाठी कारवाई केल्याबद्दल आभार मानत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. एक लाखांहून अधिक लोकांच्या रोजीरोटीचं रक्षण या माध्यमातून होणार असल्याचा उल्लेख त्यांनी यात केला.

20 रुपयांपेक्षा जास्त किंमतीची लायटर्स आयात सुरू राहणार

सरकारनं हा निर्णय आयातीला आळा घालण्यासाठी घेतला आहे. 20 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या लायटर्सवरचं आयात शुल्क मोफत हे काढून टाकून ते 'बंदी'च्या (Banned) कॅटेगरीत ठेवण्यात आलं आहे. मात्र जर सीआयएफ म्हणजेच किंमत, विमा आणि मालवाहतूक 20 रुपयांपेक्षा जास्त असेल तर हे लायटर आयात केलं जाऊ शकतं, असंही यात म्हटलं आहे.

विविध लायटर्सवर बंदी

सीआयएफचा वापर बाहेरच्या देशांमधून आयात केलेल्या वस्तूंची एकूण किंमत ठरवण्यासाठी केला जात असतो. पॉकेट लायटर, गॅस लायटर, रिफिल किंवा विना रिफील लायटर्सवर आता बंदी घालण्यात आली आहे. पॉकेट, गॅस लाइटर, रिफिल किंवा रिफिलशिवाय लाइटरची आयात मागील वर्षी 2022-23मध्ये 6.6 दशलक्ष डॉलर्स होती. तर या वर्षी एप्रिलमध्ये त्याची किंमत 1.3 लाख डॉलर इतकी होती. हे लायटर्स स्पेन, तुर्की आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये आयात केले जातात.