• 05 Feb, 2023 12:17

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Yavatmal mobile ban: किशोरवयीन मुलांच्या मोबाइल वापरावर बंदी आणणारी 'ही' पहिली ग्रामपंचायत..

Yavatmal mobile ban

Image Source : http://www.facebook.com/

Yavatmal mobile ban: किशोरवयातील मुलांना मोबाइलचे व्यसन सर्वात जास्त आहे अशी माहिती एका अहवालातून मिळाली आहे. यावर आईवडील अनेक निर्णय घेतात परंतु पुरेशा प्रमाणात त्याकडे लक्ष देऊ शकत नाही. याबाबत यवतमाळमध्ये (Yavatmal) एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे त्याबाबत जाणून घेऊया.

Yavatmal mobile ban: कोरोना काळात सर्वत्र मुलांना मोबाइलद्वारे ऑनलाइन  शिक्षण (Online Education) देण्यात आले. ज्यांच्याकडे मोबाइल उपलब्ध नव्हता त्यांना शासनाने वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून मोबाइल उपलब्ध करून दिले त्यामुळे आता 80% मुलांकडे मोबाइल आढळून येतो. कोरोना काळात शिक्षण देण्यासाठी घेतलेला मोबाइल आता त्याच शिक्षणाचा शत्रू होऊन बसला आहे. किशोरवयातील मुलांना मोबाइलचे व्यसन सर्वात जास्त आहे अशी माहिती एका अहवालातून मिळाली आहे. यावर आईवडील अनेक निर्णय घेतात परंतु पुरेशा प्रमाणात त्याकडे लक्ष देऊ शकत नाही. याबाबत यवतमाळमध्ये (Yavatmal) एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे त्याबाबत जाणून घेऊया. 

मोबईल वापरल्यास किती द्यावा लागणार दंड? (How much fine to pay if using mobile?)

यवतमाळमधील पुसद तालुक्यातील ‘बान्सी’('Bansy')या गावामध्ये ग्रामपंचायतकडून एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. किशोरवयातील मुलांना मोबाइल वापरण्यास बंदी (Prohibited use of mobile phones)आणलेली आहे. हा निर्णय घेतल्यानंतर जर कोणी मोबाइल वापरतांना आढळल्यास त्याच्यावर  200 रुपये दंड आकरण्यात येणार आहे. या ग्रामपंचायतीने 3 महत्वाचे निर्णय घेतले आहेत. 

  • किशोरवयीन मुलांना मोबाइल वापरण्यास मनाई केली आहे. 
  • 100 कर भरणाऱ्याला प्रधानमंत्री जीवन विमा योजना (Pradhan Mantri Jeevan Bima Yojana) लागु करण्यात येणार आहे. 
  • निराधार लोकांसाठी वृद्धाश्रम तयार करण्यात येणार आहे. 

किशोरवयीन मुलांच्या बाबतीत महत्वाचा निर्णय घेणारी पहिली ग्रामपंचायत….. (The first Gram Panchayat to take important decisions regarding juveniles….)

मुलांना मोबईल वापरायला बंदी करण्याचा निर्णय घेणारी बान्सी ही पहिली ग्रामपंचायत आहे. (Bansi is the first village panchayat to decide to ban children from using mobile phones.) मुलांच्या बाबतीत निर्णय घेण्याचा अधिकार आईवडिलांना असतो त्याचप्रमाणे गाव पातळीवरील गाव हिताचे निर्णय घेण्याचा अधिकार ग्रामपंचायतीला असतो. त्या अधिकाराचा पुरेपूर वापर करत या ग्रामपंचायतीने हा महत्वाचा निर्णय घेऊन सर्वांसाठी एक प्रेरणा स्त्रोत ठरली आहे. या निर्णयाला गावातील सर्व नागरिकांचा पाठिंबा आहे. 

याबाबतीत आणखी काही ठिकाणी निर्णय घेण्यात आले परंतु त्यात मोबाइल वापरण्यास संपूर्ण बंदी घातलेली नाही. सांगली (sangli) येथे इवनिंग डिटॉक्स (Evening Detox) सुरू करण्यात आले होते, म्हणजेच रात्री 7 ते 8.30 च्या सुमारास मोबईल वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. 

या निर्णयाचा उद्देश काय? (What is the purpose of this decision?)

ग्रामपंचायत सदस्यांनी सांगितले की या निर्णयामागचा हेतु मुलांना टेक्नॉलॉजीपासून (Technology) दूर करणे नाही तर अभ्यास करण्यासाठी प्रवृत्त करणे हा आहे. मोबाइलमुळे विविध प्रकारचे गेम्स (Games) मुलांना आपल्याकडे वळवून घेतात, आणि मग मुलांना त्यातून बाहेर काढणे अतिशय कठीण जाते. अनेकांना आपला जीवही गमवावा लागतो. या निर्णयाची अंबलबाजवणी एकाएकी होणार नाही, त्यासाठी वेळ लागेल आणि आईवडील मुलं या दोघांनाही यासाठी प्रयत्न करावा लागेल.