जून महिना सुरू झालाय. मागच्या महिन्यातल्या दुचाकी, व्यावसायिक वाहनांच्या विक्रीची आकडेवारी समोर आलीय. बजाज ऑटो (Bajaj Auto)ही लिस्टेड कंपनी आहे. बीएसई म्हणजेच बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजला (BSE) दिलेल्या फायलिंगमध्ये ही माहिती नमूद करण्यात आलीय. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजला दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या एकूण देशांतर्गत विक्रीत जवळपास दुपटीनं वाढ झालीय. मे 2022मध्ये, कंपनीनं 96,102 युनिट्सची विक्री केली. हेच प्रमाण मार्च 2023मध्ये 1,94,811 युनिट्स इतकं होतं.
Table of contents [Show]
टू-व्हीलर सेगमेंटच्या निर्यातीत घसरण
हे सर्व दुचाकी वाहनांच्या विक्रीचे आकडे आहेत. मात्र, या वर्षी टू-व्हीलर सेगमेंटच्या निर्यातीवर काहीसा दबाव दिसून आला. मार्च 2022मध्ये, कंपनीने 1,53,397 युनिट्सची निर्यात केली होती. मात्र मार्च 2023मध्ये कंपनीनं 1,12,885 युनिट्सची निर्यात केली. अशा परिस्थितीत या विभागात वर्षभरात 26 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली.
व्यावसायिक वाहन विक्रीची स्थिती काय?
कंपनीनं मार्च 2022मध्ये 16,206 युनिट्सची विक्री केली होती. मात्र मार्च 2023मध्ये कंपनीनं देशांतर्गत बाजारात 33,590 युनिट्सची विक्री केली. या आकडेवारीवरून विक्रीतली वाढ दिसून येते. कंपनीच्या विक्रीत जवळपास 107 टक्के वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. निर्यातीच्या बाबतीत कंपनीच्या विक्रीत वर्ष-दर-वर्षात 36 टक्के वाढ दिसून आली. कंपनीनं मार्च 2022मध्ये 10,163 युनिट्सची निर्यात केली होती आणि मार्च 2023मध्ये कंपनीने 13,862 युनिट्सची निर्यात केली होती.
एकूण विक्री किती?
कंपनीच्या एकूण विक्रीच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास, टू-व्हीलर आणि व्यावसायिक वाहनांची विक्री, देशांतर्गत बाजारपेठेत वर्षभरात 103 टक्के वाढ दिसून आलीय. मात्र, निर्यातीच्या बाबतीत दबाव दिसून येतोय. दुचाकी आणि व्यावसायिक वाहनांच्या एकूण निर्यातीत 23 टक्के घट झाल्याचं पाहायला मिळालं.
विक्रीच्या एकूण आकडेवारी
विक्रीच्या एकूण आकडेवारीवर नजर टाकल्यास मे महिन्यात एकूण 3.55 लाख युनिटची विक्री झाली. मे महिन्यात एकूण विक्री 29 टक्क्यांनी वाढून 3.55 लाख युनिट्स झाली. हा वर्षभरानंतरचा आकडा आहे. मे महिन्यात निर्यात 23 टक्क्यांनी घसरून 1.26 लाख युनिट्सवर आली. मे महिन्यात दुचाकींची विक्री 23 टक्क्यांनी वाढून 3.07 लाख युनिट झाली आणि व्यावसायिक वाहन विक्री 80 टक्क्यांनी वाढून 47452 युनिट झाली.
लाभांशही केली होता जाहीर
बजाज ऑटोनं मागच्या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीची आकडेवारी जाहीर केली होती. या तिमाहीतल्या उत्पन्नात 11.70 टक्के वाढ नोंदवण्यात आली होती. कंपनीला 1704.74 कोटी रुपयांचा महसूल मिळाला. या नंतर कंपनीनं 140 रुपयांचा लाभांशदेखील जाहीर केला. जानेवारी ते मार्चदरम्यान दुचाकीविक्री चांगली झाली. कंपनीचं उत्पादन पल्सरला मोठी मागणी होती. दुसरीकडे कंपनीनं 1 लाख तीनचाकी वाहनांचीही विक्री केली. कंपनीच्या ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिनमध्येही या कालावधीत वाढ नोंदवण्यात आली. ती जवळपास 26 टक्के इतकी होती.