भारतातील नामांकित ऑटोमोबाईल कंपनी बजाज ऑटो (Bajaj Auto) आपल्या सर्वांच्याच परिचयाची आहे. ही कंपनी दुचाकी आणि तीनचाकी वाहनांची निर्मिती करते. कंपनीने मंगळवारी (दि. 25 एप्रिल) आर्थिक वर्ष 2022-23 च्या चौथ्या तिमाहीतील (जानेवारी ते मार्च) उत्पन्नाची माहिती प्रसिद्ध केली. या माहितीनुसार तिसऱ्या तिमाहीच्या तुलनेत चौथ्या तिमाहीत कंपनीच्या उत्पन्नात 11.70% वाढ झाली आहे. या वाढीमुळे कंपनीच्या महसुलात 1704.74 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. तिसऱ्या तिमाहीत कंपनीने 1526.16 कोटी रुपये कमवले होते.
चौथ्या तिमाहीमध्ये कंपनीच्या उत्पन्नात 11.70% वाढ झाल्याने वार्षिक आधारावर कंपनीने 8929.23 कोटी रुपये कमवले आहेत. मागील वर्षी याच तिमाहीमध्ये कंपनीला 7974.84 कोटी रुपयांचा फायदा झाला होता. चौथ्या तिमाहीत कंपनीच्या उत्पन्नात वाढ झाल्याने कंपनीच्या संचालक मंडळाने प्रति शेअर्समागे 140 रुपयांचा लाभांश (Dividend) जाहीर केला आहे.
1 लाख तीनचाकी वाहनांची यशस्वी विक्री
जानेवारी ते मार्च या कालावधीत कंपनीच्या 'पल्सर' (Pulsar) या दुचाकी मॉडेलला मोठ्या प्रमाणावर मागणी होती. एकूणच देशांतर्गत दुचाकी वाहनांच्या विक्रीमध्ये कंपनीने चांगली कामगिरी केली. कंपनीने 1 लाख तीनचाकी वाहनांची यशस्वी विक्री या तिमाहीत केली आहे.
प्रति शेअर्स 140 रुपयांचा लाभांश जाहीर
कंपनीला चौथ्या तिमाहीत वाढीव नफा मिळाल्याने कंपनीने प्रति शेअर्समागे 140 रुपयांचा लाभांश देणार असल्याचे जाहीर केले आहे. गेल्या एका महिन्यापासून कंपनीच्या शेअर्समध्ये 14.04 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मंगळवारी एनएसईमध्ये (NSE) बजाज ऑटोच्या शेअरमध्ये किंचित वाढ पाहायला मिळाली. पण गेल्या एका वर्षांत कंपनीच्या शेअर्समध्ये एकूण 11.56 टक्क्यांनी वाढ झाली.
ऑपरेटिंग प्रॉफीट मार्जिनमध्ये वाढ
बजाज ऑटोच्या ऑपरेटिंग प्रॉफीटमध्येही या तिमाहीमध्ये वाढ झाली आहे. ही वाढ 26 टक्के इतकी झाली आहे. कंपनीला ऑपरेटिंग प्रॉफीटमधून 1718 कोटी रुपयांचा नफा मिळाला आहे. विशेष म्हणजे यातील प्रॉफिट मार्जिन 2.20 टक्क्यांनी वाढून 19.3 टक्क्यांवर पोहचले आहे.
Source: hindi.moneycontrol.com