खासगी बँकिंग क्षेत्रात झपाट्याने विस्तार करणाऱ्या ॲक्सिस बँकेने आपल्या मुदत ठेवींवरील व्याजाच्या दरामध्ये मोठे फेरबदल केले आहेत. या फेरबदलामध्ये बँकेने सर्व सामान्य ग्राहकांसह, ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या मुदत ठेव योजनेही व्याजाच्या दरामध्ये बदल केले आहेत. बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवींवरील (FDs) व्याजदरात बदल करण्यात आले आहेत. हे बदल 29 ऑगस्ट रोजी पासून लागू होणार आहेत. जर तुमचे या बँकेत खाते असेल किंवा तुम्हाला या बँकेत गुंतवणूक करायची असेल तर बँकेकडून व्याजदरामध्ये कोणकोणते फेरबदल केले आहेत हे जाणून घ्या.
ज्येष्ठ नागरिकांना फायदा-
ॲक्सिस बँकेने ठेवीवरील व्याजदरात केलेल्या बदलानुसार आता सर्वसामान्य खातेधारकांसाठी बँकेकडून ठेवीवर वार्षिक 3.50% ते 7.00% व्याज दिले जाणार आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी हाच व्याजदर जास्तीत जास्त 6.00% ते 7.75% पर्यंत दिला जाणार आहे. तसेच बँकेकडून 30 महिन्यांच्या मुदत ठेवींवर (FD) जास्तीत जास्त 7.10% आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.85% व्याजदर दिला जाणार आहे.
एफडीचे सुधारित दर
ॲक्सिस बँकेकडून कमीत कमी कालावधी म्हणजे 7 दिवस ते 45 च्या मुदत ठेवींवर वार्षिक 3.50% व्याज दिले जाणार आहे. तसेच एक वर्षापर्यंतच्या मुदत ठेवीवर बँकेकडून 6% दराने व्याज मिळेल. त्याचबरोबर एक वर्षापुढील म्हणजे 13 महिन्यांच्या मुदत ठेवींवर 6.80% व्याज मिळणार आहे. तसेच 13 महिन्यांच्या पुढे आणि 30 महिन्यांच्या मुदतीवर 7.10% व्याज दर देण्यात येणार आहे. तर 5 वर्षे ते 10 वर्षापर्यंतच्या दीर्घ मुदतीच्या ठेवींवर बँकेकडून 7.00% व्याजदर दिला जाणार आहे. यासह विविध कालावधीच्या ठेवींनुसार बँकेच्या व्याजदरात बदल करण्यात आलेले आहेत.
मोबाईल वरून 5000 एफडी
जर तुम्हाला ॲक्सिस बँकेच्या एफडीमध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही किमान 5000 रुपयांपासून गुंतवणूक करता येईल. मात्र ही गुंतवणूक तुम्ही फक्त मोबाईल बँकिंगच्या माध्यमातून करू शकता. जर तुम्हाला बँकेंच्या शाखेत जाऊन गुंतवणूक करायची असेल तर मात्र बँकेचा नियम थोडा वेगळा आहे. बँकेत जाऊन एफडी करण्यासाठी ग्राहकांना किमान 10000 रुपयांची एफडी करावी लागेल. तसेच टॅक्समुक्त एफडीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला दीड लाखांपर्यंतची एफडी करता येईल. त्यासाठी 5 वर्षाचा कालावधी आहे.