खासगी क्षेत्रातील अॅक्सिस बँक आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या सेवा उपलब्ध करून देते. बुधवारी बँकेने आपल्या ग्राहकांसाठी मोबाईल अप्लिकेशनवर आधारित एक नवीन फिचर लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. त्याचे नाव आहे, 'वन व्ह्यू सर्व्हिस'(One View Service). ही एक अकाउंट एग्रीगेटर इकोसिस्टिम (Account Aggregator Ecosystem) बँकिंग सेवा आहे. ही सेवा देणारी अॅक्सिस बँक ही एकमेव बँक ठरणार आहे. वन व्ह्यू सर्व्हिसमध्ये ग्राहकांना कोणत्या सुविधा मिळतील, जाणून घेऊयात.
'वन व्ह्यू सर्व्हिस' बद्दल जाणून घ्या
अॅक्सिस बँक लवकरच आपल्या ग्राहकांसाठी वन व्ह्यू सर्व्हिस (One View Service) सुरू करणार आहे. या सेवे अंतर्गत ग्राहकांना एकाच प्लेटफॉर्मवर अनेक बँकांच्या खात्यांमध्ये प्रवेश करता येणार आहे. तसेच बॅलन्स चेक करणे, वेळेवर आर्थिक व्यवहार करणे आणि त्याचा ट्रॅक ठेवण्यासाठी देखील मदत होणार आहे. ही एक अकाउंट एग्रीगेटर इकोसिस्टिम (Account Aggregator Ecosystem) बँकिंग सेवा असणार आहे. ज्याच्या मदतीने ग्राहकांना आर्थिक व्यवस्थापन करण्यासाठी मदत होणार आहे. ही सेवा देणारी अॅक्सिस बँक एकमेव बँक असणार आहे.
कोणत्या सुविधा मिळतील?
वन व्ह्यू सर्व्हिसद्वारे बँकेच्या ग्राहकांना अॅक्सिस मोबाईल अॅपमध्ये इतर बँक खाती लिंक (link) करण्याची ऑनबोर्डिंग सेवा (Onboarding service) उपलब्ध करून दिली जाणार आहे. याशिवाय अनेक बँक खात्यांचे सर्व तपशील आणि त्यातील बॅलन्स तसेच सर्व आर्थिक व्यवहारांची माहिती या सेवेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जाणार आहे.
या सुविधेद्वारे, ग्राहक लिंक केलेल्या बँक खात्याचे आर्थिक व्यवहाराचे तपशील डाउनलोड करू शकतात. याशिवाय ग्राहक त्यांच्या सोयीनुसार एक किंवा इतर सर्व बँकांची खाती डीलिंक (delink) देखील करू शकतात. आर्थिक व्यवहारासंदर्भातील माहिती शेअर करण्याचा सुरक्षित पर्यायही या सुविधेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
बँकेचे अधिकारी काय म्हणाले?
अॅक्सिस बँकेच्या डिजिटल बिजनेस अँड ट्रान्सफॉर्मेशनचे मुख्य अधिकारी समीर शेट्टी (Sameer Shetty, Chief Digital Business and Transformation Officer, Axis Bank) म्हणाले की, अॅक्सिस बँकेचा ओपन बँकिंग सिस्टीमवर मोठ्या प्रमाणावर विश्वास आहे. त्यामुळेच आम्ही डिजिटल फस्ट (Digital First) यासारख्या उत्पादनामध्ये गुंतवणूक करत आहोत. या अकाउंट एग्रीगेटर सिस्टीमला आम्ही मोबाईल बँकिंग अँपवर लॉन्च करण्यासाठी उत्सुक आहोत.
या सुविधेमुळे ऑनलाईन बँकिंगचा अनुभव सहज आणि सोपा होणार आहे. यामुळे ग्राहकांना एका वेळी अनेक बँकांचे आर्थिक व्यवहार पाहणे शक्य होणार आहे. वन व्ह्यू सर्व्हिसमुळे बँकिंग क्षेत्रात एक क्रांतिकारी पाऊल पडेल.
Source: hindi.news18.com