सुरक्षित गुंतवणूक पर्यायांपैकी एक म्हणजे मुदत ठेव योजना (Bank FD). या योजनेत गुंतवणूक करून ग्राहक सर्वाधिक परतावा मिळू शकतात. देशातील खाजगी क्षेत्रातील ॲक्सिस बँकेने त्यांच्या मुदत ठेवीवरील व्याजदरात वाढ केली आहे. हे व्याजदर 2 कोटींपेक्षा कमी रकमेच्या गुंतवणुकीवर वाढवण्यात आले आहेत. ॲक्सिस बँकेने मुदत ठेवीवरील व्याजदरात 0.10 टक्क्यांची वाढ केली आहे.
बँकेच्या वेबसाईटवरील माहितीनुसार हे नवीन व्याजदर काल म्हणजेच 17 जुलै 2023 पासून लागू करण्यात आले आहेत. बँक आपल्या ग्राहकांना 7 दिवसापासून ते 10 वर्षापर्यंत मुदत ठेवीमध्ये गुंतवणूक करण्याची संधी उपलब्ध करून देत आहे. या कालावधीसाठी बँक 3.5% ते 7.20% व्याजदर देणार आहे. जर तुम्हालाही ॲक्सिस बँकेच्या मुदत ठेवीमध्ये गुंतवणूक करायची असेल, तर नवीन व्याजदर आणि गुंतवणूक कालावधी जाणून घेऊयात.
मुदत ठेवीचा कालावधी आणि व्याजदर जाणून घ्या
ॲक्सिस बँक आपल्या ग्राहकांना 7 दिवसापासून ते 45 दिवसांच्या कालावधीतील मुदत ठेवीवर सर्वसामान्य नागरिकांना आणि ज्येष्ठ नागरिकांना 3.50% व्याजदर देत आहे. तसेच 46 दिवस ते 60 दिवसातील कालावधीसाठी केलेल्या मुदत ठेवीवर सर्वसामान्य नागरिकांना आणि जेष्ठ नागरिकांना 4% व्याजदर मिळणार आहे.
61 दिवस ते तीन महिन्यापेक्षा कमी कालावधीसाठी केलेल्या मुदत ठेवीत सर्वसामान्य नागरिकांना आणि ज्येष्ठ नागरिकांना 4.50% व्याजदर मिळणार आहे. 3 महिने ते 6 महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी केलेल्या मुदत ठेवीवर बँक सर्वसामान्य नागरिकांना आणि जेष्ठ नागरिकांना 4.75% व्याजदर देणार आहे.
दिर्घकाळाच्या मुदत ठेवींवरील व्याजदर जाणून घ्या
याशिवाय 6 महिने ते 9 महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी सर्वसामान्य नागरिकांना 5.75% तर ज्येष्ठ नागरिकांना 6% व्याजदर मिळणार आहे. 9 महिने ते 1 वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी सर्वसामान्य नागरिकांना 6% आणि जेष्ठ नागरिकांना 6.25% व्याजदर मिळणार आहे.
1 वर्ष ते 1वर्ष 24 दिवसांपेक्षा कमी कालावधीसाठी केलेल्या मुदत ठेवीत सर्वसामान्य नागरिकांना 6.75% तर ज्येष्ठ नागरिकांना 7.50% व्याजदर मिळणार आहे. तसेच दीर्घकाळाच्या दृष्टीने गुंतवणूक करण्याचा तुम्ही विचार करत असाल, तर 3 वर्ष ते 10 वर्षाच्या दरम्यान केलेल्या मुदत ठेवीवर सर्वसामान्य नागरिकांना 7% तर ज्येष्ठ नागरिकांना 7.75% व्याजदर मिळणार आहे.
Source: hindi.moneycontrol.com