राज्य सरकारतर्फे मुलींच्या सर्वांगिण विकासासाठी विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात. विशेषकरून राज्यातील ग्रामीण भागामध्ये अजूनही मुलींच्या शिक्षणाबाबत हवी तशी जागृकता झालेली दिसून येत नाही. परिणामी मुलींच्या शाळेत येणाऱ्या गळतीचे प्रमाण वाढत आहे. ते रोखण्यासाठी आणि पालकांवरील मुलींच्या शिक्षणाचा आर्थिक भार कमी करण्यासाठी शिष्यवृ्त्ती योजना राबवली जाते. पूर्वी ही योजना फक्त 5 वी ते 7 वीच्या मुलींना दिली जात होती. पण 2003-04 पासून ती आता 8 वी ते 10 वी पर्यंतच्या मुलींसाठीही लागू केली आहे.
Table of contents [Show]
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्तीसाठी पात्रता काय?
- विमुक्त जाती भटक्या जमाती, विशेष आर्थिक मागास किंवा इतर मागास वर्गातील मुलींना ही शिष्यवृत्ती लागू.
- सदर मुली इयत्ता पाचवी ते दहावी मध्ये शिकणाऱ्या असाव्यात.
- मुली सरकार मान्य शाळेत नियमित शिक्षण घेणाऱ्या हव्यात.
- या योजनेसाठी मुलींच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती किंवा शैक्षणिक गुण ग्राह्य धरले जात नाही.
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्तीतून मिळणारे लाभ
- विमुक्त जाती भटक्या जमाती, विशेष आर्थिक मागास किंवा इतर मागास वर्गातील 5वी ते 7वी पर्यंतच्या मुलींना प्रत्येक महिन्याला 60 रुपये यानुसार 10 महिन्यांसाठी 600 रुपये दिले जातात.
- तसेच विमुक्त जाती भटक्या जमाती, विशेष आर्थिक मागास किंवा इतर मागास वर्गातील 8वी ते 10वी च्या मुलींना प्रत्येक महिन्यासाठी 100 रुपये याप्रमाणे 10 महिन्यांसाठी 1000 रुपये दिले जातात.
अर्ज करण्याची पद्धत
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी पालकांना किंवा विद्यार्थ्यांना कोणताही अर्ज भरावा लागत नाही. ही प्रक्रिया शाळेच्या मुख्याध्यापकांना पार पाडावी लागते. फक्त पालकांनी शिक्षकांना किंवा मुख्याध्यापकांना याबाबत शाळा सुरू झाल्यानंतर विचारणा करणे गरजेचे आहे किंवा त्याविषयी शाळेला अर्ज द्यावा. तसेच जिल्हा परिषदेतील समाज कल्याण विभागाचे अधिकारी आणि समाज कल्याण मंडळाचे सहाय्यक आयुक्त यांच्याकडून सविस्तर माहिती मिळू शकते.
शिष्यवृत्तीसाठी आवश्यक कागदपत्रे
- या शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी पुढील कागदपत्रे शाळेच्या मुख्याध्यापकांकडे जमा करावी लागतात.
- मागील वर्षाची मार्कशीट
- जातीचा दाखला
- आधार कार्ड
- बँकेच्या पासबुकची झेरॉक्स