कमर्शियल हेवी वाहनांची निर्मिती करणाऱ्या अशोक लेलँड कंपनीने नोयडा येथे भरलेल्या ऑटो एक्स्पोमध्ये अत्याधुनिक टेक्नॉलॉजी वापरून तयार केलेल्या गाड्यांचे दिमाखदार प्रदर्शन केले. भविष्यामध्ये कमर्शियल गाड्या कशा असतील याची झलक यातून पाहायला मिळते. वेगवेगळ्या इंधनावर चालणाऱ्या सात गाड्या कंपनीने प्रदर्शनात सादर केल्या आहेत. यामध्ये ट्रॅक, मिनी बस, बस अशा गाड्यांचा समावेश आहे.
अशोक लेलँड ही हिंदुजा ग्रूपची कंपनी असून भारतामध्ये कमर्शियल वाहने तयार करणारी आघाडीची कंपनी आहे. भविष्यामध्ये प्रवासी आणि मालवाहतुकीसाठी गाड्या कशा असतील, हे या अत्याधुनिक गाड्यांमधून दिसते. इलेक्ट्रिक आणि हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या गाड्यांचा यात समावेश आहे.
एक्स्पोमध्ये सादर केलेल्या अशोक लेलँड कंपनीच्या गाड्या
1) बॅटरी इलेक्ट्रिक व्हेइकल
2)फ्युअल सेल इलेक्ट्रिक व्हेइकल
3) हायड्रोजन इंटरनल कंम्बशन इंजिन व्हेइकल
4) लिक्विफाइड नॅचरल गॅस व्हेइकल
5) इंटरसिटी सीएनजी बस
6) मिनी पॅसेंजर बस
जीवाश्म इंधनाला पर्याय असलेली भविष्यातील वाहने कंपनीने लाँच केली आहेत. येत्या काळात रस्त्यांवर हेवी कमर्शियल वाहने इलेक्ट्रिक किंवा हायड्रोजन इंजिनवर चालणारी असतील. या गाड्यांचे भविष्यात प्रमाण वाढेल. फक्त कारच नाही तर अवजड वाहनेही ग्रीन एनर्जीचा वापर करून रस्त्यांवर धावतील. मागील दोन वर्षात वाहन निर्मितीमध्ये अनेक अत्याधुनिक तंत्रज्ञान आले आहे. प्रदूषण विरहीत वाहनांना सरकारकडूनही प्रोत्साहन देण्यात येत आहे. भविष्यामध्ये भारताला ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर बनण्यासाठी अशोक लेलँड कंपनी काम करेल, कंपनीचे सीईओ शेनू अगरवाल यांनी म्हटले.