Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Athiya Shetty: अथिया शेट्टी व केएल राहुलच्या लग्नाचा खर्च अंदाजे 1000 कोटी, तर अथियाचा लहेंगा बनविण्यासाठी लागले दहा तास

Athiya Shetty Wedding Cost

Image Source : http://www.india.postsen.com/

Athiya Shetty Wedding Cost: बाॅलिवुडमध्ये अण्णा नावाने प्रसिध्द असलेला अभिनेता सुनिल शेट्टी (Sunil Shetty) यांची मुलगी अथिया शेट्टी व भारतीय टीममधील क्रिकेटर केएल राहुल नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत. यांचा हा शाही विवाह एकदम धुमधडाक्यात पार पडला. या राॅयल लग्नाचा किती खर्च आला व अथियाने लग्नात घातलेल्या आऊटफीटविषयी जाणून घेवु.

Athiya Shetty & KL Rahul Wedding: अभिनेत्री अथिया शेट्टी व क्रिकेटर केएल राहूल यांचा शाही विवाह नुकताच पार पडला. या जोडीच्या लग्नाविषयीच्या चर्चेने सोशलमिडीयावर तुफान रंग आणले आहे. हे लॅविश लग्न व अथियाचा महागडया लहेंगाबाबत थोडक्यात जाणून घेवु.

अथिया शेट्टी लग्न खर्च (Athiya Shetty Wedding Expenses) 

बाॅलिवुडच्या महागडया लग्नामध्ये अभिनेत्री अथिया शेट्टी व क्रिकेटर केएल राहुल यांच्या लग्नाचादेखील समावेश झाला आहे. यांचे लग्न सुनिल शेट्टी यांच्या खंडाळा येथील फार्महाऊसवर संपन्न झाले. या लग्नातील खाण्याच्या मेन्यूपासून ते अथियाने घातलेल्या आउटफीटची तुफान चर्चा आहे.  या शाही लग्नासाठी अंदाजे 1000 कोटी खर्च करण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे.

आथिया शेट्टीचा लहेंगा बनविण्यासाठी दहा हजार तास (Ten thousand hours to make an Athiya Shetty lehenga)

अथिया शेट्टीचा हा लग्नाचा आउटफीट म्हणजेच लहेंगा तयार करण्यासाठी साधारण दहा हजार तास लागले आहे. म्हणजेच 416 दिवसांच्या मेहनतीनंतर हा सुंदर लहेंगा तयार झाला आहे. हा सुंदर व आकर्षक लहेंगा ‘अनामिका खन्ना’ (Anamika Khanna) व तिच्या टीमने बनविला आहे. हा लहेंगा पूर्णपणे रेशम, जरदोजी, कुंदन व जाळीने तयार केला आहे. पिस्टल पिंक कलरचा या लहेंगामध्ये अथिया शेट्टी खूपच सुंदर दिसत होती.