HMA Agro Industries IPO: एचएमए अॅग्रो ही कंपनी मागील 40 वर्षांपासून मांस उत्पादन इंडस्ट्रीमध्ये कार्यरत आहे. कंपनी आयपीओच्या माध्यमातून 480 कोटी रुपये उभारण्याचा विचार करत आहे. कंपनी एकूण आयपीओमधील 150 कोटी रुपयांचे फ्रेश इश्यू विकणार असून प्रमोटर्स आणि सध्याच्या शेअर होल्डरांकडी 330 कोटी रुपयांचे शेअर्स ऑफर फॉर सेलच्या माध्यमातून विक्रीसाठी उपलब्ध करून देणार आहे.
Table of contents [Show]
150 कोटी रुपयांचे फ्रेश इश्यू उपलब्ध
एचएमए अॅग्रो इंडस्ट्रीज कंपनीचा आयपीओ 20 जून रोजी ओपन होणार असून तो 23 जून रोजी बंद होईल. कंपनी नवीन फ्रेश इश्यूसोबतच आणि प्रमोटर्सचे इश्यूसुद्धा विकणार आहे. कंपनीने एकूण 480 कोटी रुपयांचा आयपीओ आणण्याचे ठरवले आहे. यात 150 कोटी रुपयांचे फ्रेश इश्यू असून 330 कोटी रुपयांचे ऑफर फॉर सेलमधील इश्यू विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. कंपनीचे भागधारक वाजिद अहमद, गुलजार अहमद, मोहम्मद मेहमूद कुरेशी, मोहम्मद अशरफ कुरेशी, झुल्फिकार अहमद कुरेशी आणि परवेझ आलम हे आपला हिस्सा विकणार आहेत.
29 जूनला शेअर्सचे वाटप तर 4 जुलैला होणार लिस्टिंग
सर्वसामान्या गुंतवणूकदारांना 20 जूनपासून यामध्ये गुंतवणूक करता येणार आहे. तर अँकर गुंतवणूकदार 19 जूनपासून गुंतवणूक करू शकणार आहेत. 29 जूनला कंपनीन शेअर्सचे वाटप करणार आहे. ज्यांना आयपीओचा लॉट लागला नाही, त्यांच्या बँक खात्यात 30 जूनपर्यंत पैसे जमा होतील आणि ज्यांना लॉट लागला आहे. त्यांच्या डीमॅट खात्यात 3 जुलैपर्यंत शेअर्स जमा होतील. 4 जुलै रोजी एचएमए अॅग्रो इंडस्ट्रीज कंपनीचे बीएसई आणि एनएसईवर लिस्टिंग होईल.
एचएमए अॅग्रो इंडस्ट्रीज कंपनीचा आयपीओचे व्यवस्थापन आर्यमान फायनान्शिअल सर्व्हिसेस (Aryaman Finanial Services Ltd) कंपनी पाहणार आहे. तर बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आयपीओ रजिस्ट्रार म्हणून काम पाहणार आहे.
कंपनीचे प्रोडक्ट काय आहे?
एचएमए अॅग्रो इंडस्ट्री (HMA Agro Industry) कंपनी म्हशीचे बोनलेस मांस निर्यात करणारी भारतातील तिसरी मोठी कंपनी आहे. केंद्र सरकारच्या स्टार एक्सपोर्स हाऊसमध्ये या कंपनीची नोंद असून, ही कंपनी ब्लॅक गोल्ड, कमिल आणि एचएम या ब्रॅण्डच्या नावाने युएई, इराक, सौदी अरेबिया, ओमान, बहरिन आणि जॉर्डन या देशांसह जगभरातील 40 देशांमध्ये मांस निर्यात करते.
याचबरोबर कंपनी आता फ्रोझन फिश प्रोडक्ट्स आणि बासमती तांदूळ यामध्येही देखील उतरली आहे. भविष्यात कंपनी पोल्ट्री आणि इतर शेतीशी निगडित प्रोडक्टमध्येही उतरणार आहे. कंपनीचे कॉर्पोरेट आणि नोंदणीकृत ऑफिस उत्तर प्रदेशमधील आग्रामध्ये आहे.
कंपनीची आर्थिक स्थिती
मार्च 2022 मध्ये कंपनीला एकूण 3,138.98 कोटी रुपयांचा महसूल मिळाला असून त्यातील 117.62 कोटी रुपयांचा निव्वळ नफा होता. मागील वर्षाच्या तुलनेत 2022 मध्ये कंपनीला चांगलाच फायदा झाला होता. 2021 मध्ये कंपनीने 1,720.40 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला होता. त्यातून कंपनीला 71.60 कोटी रुपयांचा नफा झाला होता.