Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Upgrade Your Insurance: वाढत्या वयातील गरजांबरोबर तुम्ही इन्शुरन्स पॉलिसी अपग्रेड करता का?

Can You Upgrade Your Insurance

Image Source : www.myinsurancebroker.com

Upgrade Your Insurance: वाढत्या वयाबरोबर येणारे आजार किंवा त्यासंबंधित गोष्टींचा आढावा घेऊन त्यानुसार इन्शुरन्स प्लॅनमध्ये बदल करून घेतले पाहिजेत. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्या गरजा या बदलत असतात. त्या गरजांनुसार इतर गोष्टींमध्ये सुद्धा बदल करणे गरजेचे आहे.

Upgrade Your Insurance: आपले आयुष्य जसेजसे पुढे जात असते, त्याप्रमाणे आपण आपल्या दैनंदिन जीवनात बदल करत असतो. जसे की, आपले राहणीमान, आर्थिक गरजा, भविष्यतील गुंतवणुकीच्या योजना यांचा विचार करून त्यातील बदल स्वीकारत असतो. त्याप्रमाणे आपण आपली इन्शुरन्स पॉलिसीसुद्धा अपग्रेड केली पाहिजे.

वाढत्या वयाबरोबर येणारे आजार किंवा त्यासंबंधित गोष्टींचा आढावा घेऊन त्यानुसार इन्शुरन्स प्लॅनमध्ये बदल करून घेतले पाहिजेत. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्या गरजा या बदलत असतात. त्या गरजांनुसार इतर गोष्टींमध्ये सुद्धा बदल करणे गरजेचे आहे.

भविष्यातील जोखीम कमी करा

जे तरुण आहेत आणि त्यांचे लग्न झालेले नाही. त्या सध्या तरी आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आहेत. पण बरेच तरुण हे विविध जोखमींमधून जात असतात. काही जण रिव्हर राफ्टिंग, पॅराग्लायडिंग, ट्रेकिंग अशा खेळांमध्ये सहभागी होत असतात. त्यांच्यासाठी वैयक्तिक अपघात आणि अपंग विमा खूपच गरजेचा आहे. कारण आपण सध्या जी जीवनशैली स्वीकारली आहे. त्याचा आपल्या इन्शुरन्स पॉलिसीमध्ये समावेश आहे क? हे तपासून त्याचा त्यात समावेश करणे गरजेचे आहे.

पालकांवरील आर्थिक ताण कमी करा

एखाद्या तरुणाने परदेशात शिकण्यासाठी एज्युकेशनल लोन घेतले आहे; आणि काही दुर्घटनेमुळे त्याचा मृत्यू झाला. तर त्याच्या शिक्षणासाठी काढलेले कर्ज हे पालकांसाठी केवढा मोठा आर्थिक मोठा बोजा होऊ शकतो. अशावेळी त्या तरुणाने टर्म इन्शुरन्स पॉलिसी काढली असती तर त्यातून मिळालेल्या इन्शुरन्सच्या रकमेतून पालकांवरील आर्थिक बोजाचा भार कमी होण्यास मदत होऊ शकते.

जोडीदारासाठी पुरेशी तरतूद करा

लग्न झालेल्या पण मुले नसलेल्या जोडप्यांनी आपल्या जोडीदाराच्या भविष्याचा विचार करून चांगला इन्शुरन्स प्लॅन निवडणे गरजेचे आहे. कारण लग्न झाल्यानंतर सुरुवातीची काही वर्षे दोघेही नोकरी करत असाल तर दोघांनी आपल्या जोडीदाराचा विचार करून वैयक्तिक अपघात, अपंगत्व, गंभीर आजारांशी संबंधित चांगल्या पॉलिसीची निवड करणे गरजेचे आहे. यामुळे भविष्यातील आर्थिक जोखीम कमी होण्यास मदत होईल आणि आजारपणांमुळे किंवा अचानक येणाऱ्या आर्थिक संकटांवर मात करण्यासाठी पुरेसे नियोजन असणे गरजेचे आहे.

कुटुंबातील सर्व सदस्यांचा विचार करा

लग्न झालेले असून मुले असलेल्या पालकांनी आपल्या मुलांसाठी आणि एकूणच कुटुंबाचा विचार करून वेळोवेळी आपल्या इन्शुरन्स पॉलिसींचा आढावा घेणे गरजेचे आहे. लग्नानंतर पत्नीबरोबरच मुले, आई-वडिल अशी चौफेर जबाबदारी पार पाडावी लागते. यासाठी नेहमीच तत्पर असणे गरजेचे आहे. इन्शुरन्स पॉलिसीमध्ये कुटुंबातील सर्व सदस्य कव्हर होत आहेत का? त्यांना प्रत्येकी किती लाभ मिळू शकतो. याचे नियोजन करून त्याचा एकूण कव्हर आणि प्रीमिअममध्ये वाढ करणे गरजेचे आहे.

चांगल्या आरोग्य सुविधांमुळे आयुर्मान वाढले

कुटुंबातील सर्व सदस्यांची काळजी घेत असताना तुम्ही कुटुंबात एकटे कमावणारे असाल, तर स्वत:ची काळजी घेणे सुद्धा गरजेचे आहे. कारण तुमच्यानंतर तुमच्या कुटुंबाचा आर्थिक भार सांभाळण्यासाठी तुमचा टर्म इन्शुरन्स असणे गरजेचे  आहे.जो तुम्हाला 85 व्या वयापर्यंत आर्थिक सुरक्षितता देऊ शकतो. आरोग्या क्षेत्रातील प्रगतीमुळे सध्याचे आपले आयुर्मान 70 वर्षापर्यंत वाढले आहे. त्यामुळे 60 वर्षांचा विचार करून काढलेली पॉलिसी आपल्याला अपग्रेड करणे गरजेचे आहे.

अशाप्रकारे आयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यांवर आपल्या इन्शुरन्स पॉलिसीचा आढावा घेऊन त्यात बदल करणे गरजेचे आहे. वाढत्या वयाबरोबर आपल्या उत्पन्नाबरोबर जबाबदाऱ्या ही वाढतात. त्यामुळे पॉलिसीचा कव्हर पुरेसा आहे की नाही हे तपासून त्यात वाढ करणे सुद्धा गरजेचे आहे.