CAMS Online: CAMS ही एक सेबीकडे रजिस्टर्ड असलेली नियंत्रक आणि हस्तांतरण एजन्सी आहे. ही संस्था म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार आणि म्युच्युअल फंड कंपन्या यांना तंत्रज्ञानावर आधारित विविध सेवा पुरवते.
Table of contents [Show]
मागील 25 वर्षांपासून ग्राहकांच्या सेवेत
कॅम्स (CAMS) ही संस्था मागील 25 वर्षांपासून म्युच्युअल फंड आणि त्याच्याशी संबंधित विविध आर्थिक सेवा ग्राहकांना उपलब्ध करून देत आहे. या आर्थिक सेवा देताना कॅम्सने नवनवीन तंत्रज्ञानाचा आधार घेत ग्राहक आणि म्युच्युअल फंड कंपन्यांना सुविधा पुरवत आहेत. भारतीय म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमधील रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजन्सी म्हणून कॅम्पसकडे जवळपास मार्केटमधील 69 टक्के हिस्सा आहे.
कॅम्स टेक्नॉलॉजीवर आधारित वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा तर देत आहेच. पण त्यामध्ये सर्वसामान्य ग्राहकांसह, म्युच्युअल फंड कंपन्या, इन्शुरन्स कंपन्या आणि थेट बीटूबी सेवा देत आहे. आता तर कॅम्सने मोबाईल अॅप आणि चॅटबॉटच्या माध्यमातूनही सेवा देण्यास सुरुवात केली.
कॅम्स नेमके काय करते?
कॉम्प्युटर एज मॅनेजमेंट सर्व्हिसेस (CAMS) ही एचडीएफसी ग्रुप (HDFC Group), नॅशनल स्टॉक एक्सचेंज (National Stock Exchange-NSE) आणि अॅक्सीस इन्व्हेस्टमेंट (Acsys Investment) कंपनीच्या सहकार्याने विविध म्युच्युअल फंड हाऊससाठी युझर फ्रेंडली सेवा पुरवत आहे.
CAMS Online
CAMS चे myCAMS या नावाने ऑनलाईन पोर्टल आहे. गुंतवणूकदार या पोर्टलवरील मेलबँक सर्व्हिसचा वापर करून म्युच्युअल फंड स्टेटमेंट मिळवू शकते. गुंतवणूकदाराला पॅनकार्ड आणि रजिस्टर्ड ई-मेल टाकून म्युच्युअल फंडचे स्टेटमेंट मिळवता येतात. इथे गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंडवरील अल्पकालीन भांडवली नफा (Short-Term Capital Gains) तसेच दीर्घकालीन भांडवली नफा (Long-Term Capital Gains) काढून मिळतो. ज्याचा उपयोग आयटीआर फाईल करताना होतो. त्याचबरोबर वेगवेगळ्या एएमसी (Asset Management Companis-AMC)कंपन्यांच्या योजनांची विश्लेषणात्मक माहिती येथे उपलब्ध असते.
कॅम्सद्वारे पुरवल्या जाणाऱ्या सेवा
CAMS Online ही संस्था फक्त फंड मॅनेजर आणि डिस्ट्रिब्युटर यांच्यासाठी बीटूबी सेवा देत नाही. तर ते देशभरातील ग्राहकांना वेगवेगळ्या माध्यमातून म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीशी संबंधित विविध सेवा देत आहे. म्युच्युअल फंड मार्केटमधील जवळपास 60 सेवा कॅम्स पुरवत आहे.
कॅम्स कोणत्याही म्युच्युअल फंडबद्दल ग्राहकांना सल्ला देत नाही. पण म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी लागणारे खाते, स्टेटमेंट, केवायसी अशा सर्व प्रकारच्या सेवा पुरवते.
CAMS ही आयएसओ सर्टिफाय कंपनी आहे; त्यामुळे कॅम्पकडून मिळणाऱ्या सर्व सेवा या उत्तमच असतात. कॅम्सवर दरवर्षी जवळपास 50 लाख खाती ओपन केली जातात.
e-KYC ही एक चांगली सुविधा कॅम्सद्वारे पुरवली जाते. यासाठी कंपनीकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही. ऑनलाईन पोर्टल आणि मोबाईल अॅप अशा दोन्ही माध्यमातून या सेवेचा लाभ घेता येतो.
CAMS Online वर असे रजिस्टर करा
- सर्वप्रथम MyCAMS वेबपोर्टलवर जा.
- New User Registration वर क्लिक करून ई-मेल आयडी व इतर माहिती भरा.
- कॅम्सवर खाते ओपन झाले की, ई-मेल आयडी आणि पॅनकार्डशी संबंधित सर्व फंडांची माहिती इथे पाहता येते.