Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Mahajyoti Free Tablet Yojna: महाराष्ट्र सरकारच्या 'या' योजनेत नोंदणीसाठी उरले फक्त 2 दिवस...

Mahajyoti Free Tablet Yojna

Mahajyoti Free Tablet Yojna: दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना इंजिनीअरिंग, मेडिकलची तयारी करायची असते, मात्र आर्थिक परिस्थितीमुळे महागडे कोचिंग क्लासेस परवडत नसल्यामुळे महाज्योती संस्थेने विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन कोचिंग प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला आहे.

Mahajyoti Free Tablet Yojna: केंद्र सरकार आणि राज्य सरकार देशातील विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबवित आहे. त्यापैकी एक योजना महाज्योती मोफत टॅबलेट योजना आहे जी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाने महाज्योती (Mahatma Jyotiba Phule Research and Training Institute) च्या सहकार्याने इयत्ता 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट देण्याची योजना सुरू केली आहे.

दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना इंजिनीअरिंग, मेडिकलची तयारी करायची असते, मात्र आर्थिक परिस्थितीमुळे महागडे कोचिंग क्लासेस परवडत नसल्यामुळे महाज्योती संस्थेने विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन कोचिंग प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला आहे. तुम्हाला मोफत टॅबलेट योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला सरकारच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा लागेल. 

फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र 

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती नागपूर अंतर्गत दरवर्षी दहावीनंतर  आर्थिक मागासलेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी मदत केली जाते. महाज्योती योजनेअंतर्गत, विज्ञान शाखेच्या अंतर्गत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना MHT-CET/JEE/NEET-2025 साठी मोफत कोचिंगसाठी मोफत टॅब्लेटचे वाटप केले जाते. ज्याचा वापर करून आर्थिकदृष्ट्या मागासलेले विद्यार्थी त्यांच्या शिक्षणाचा आणि त्यांना मिळालेल्या या सुविधांचा उपयोग करून त्यांचे भविष्य सुधारू शकतात. 

फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र योजनेच्या लाभासाठी पात्रता निकष

  • उमेदवार महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवासी असणे आवश्यक आहे. 
  • उमेदवार हा इतर मागासवर्गीय किंवा विमुक्त जाती-भटक्या जमाती प्रवर्गातील असावा. 
  • उमेदवार हा नॉन-क्रिमिलेअर या उत्पन्न गटातील असावा. 
  • जे  विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र असून त्या सर्व विद्यार्थ्यांनी योजनेंतर्गत अर्ज करतांना दहावी वर्गाचे प्रवेश पत्र,
  • आणि नवव्या वर्गाची गुणपत्रिका अर्जाला जोडावी, 
  • त्याचबरोबर  या योजनेमध्ये लाभ मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेत प्रवेश घेणे आवश्यक आहे, 
  • आणि या संबंधित कागदपत्रे त्यांनी भविष्यात मार्गदर्शना प्रमाणे उपलोड करणे आवश्याक आहे.

फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र 2023 योजनेच्या अटी आणि नियम

  • महाराष्ट्र मोफत टॅबलेट योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांनाच दिला जाणार आहे.
  • या योजनेंतर्गत अर्जदार विद्यार्थ्यांनी 10वी उत्तीर्ण आणि 11वी मध्ये विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा.
  • फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र या योजनेत अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 31/03/2023 हा आहे 
  • या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी पोस्टाने किंवा ई-मेलच्या माध्यमातून अर्ज करणे विचारात घेतले जाणार नाही. 
  • जर अर्जदार विद्यार्थ्यांनी शासनाच्या इतर कोणत्याही योजनेंतर्गत टॅबलेटचा लाभ घेतला असेल, 
  • तर त्या विद्यार्थ्याला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • या योजनेंतर्गत जाहिरात रद्द करणे किंवा मुदतवाढ देणे, अर्ज नाकारणे किंवा अर्ज स्विकारणे,
  • या संबंधित संपूर्ण अधिकार हे व्यवस्थापकीय संचालक, महाज्योती यांचेकडे असतील

फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र अंतर्गत आवश्यक कागदपत्रे 

या शासनाच्या योजनेंतर्गत लाभ मिळविण्यासाठी काही आवश्यक कागदपत्रांची गरज असेल हि आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे असतील

  • विद्यार्थ्याची 9व्या वर्गाची गुणपत्रिका 
  • विद्यार्थ्याला 10 वी च्या परीक्षेचे ओळखपत्र 
  • आधार कार्ड 
  • रहिवासी दाखला 
  • अधिकृत जातीचे प्रमाणपत्र
  •  नॉन-क्रीमिलेअर प्रमाणपत्र 

या योजनेंतर्गत अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम विद्यार्थ्याला महाज्योती  या शासनाच्या अधिकृत पोर्टलवर भेट द्यावी लागेल

Source: https://www.mahayojanaa.in/2023/03/free-tablet-yojana-maharashtra.html