Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

परदेशी शिष्यवृत्ती - 2022 साठी त्वरित अर्ज करा

परदेशी शिष्यवृत्ती - 2022 साठी  त्वरित अर्ज करा

परदेशी शिक्षण घेण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे शिष्यवृत्ती 2022 (Scholarship 2022) जाहीर करण्यात आली आहे. यासाठी 23 जून पर्यंत विद्यार्थी अर्ज करू शकतात.

समाजातील सर्व स्तरातील घटकांना सामान पातळीवर आणण्यासाठी तसेच हुशार विद्यार्थ्यांनी शिकून आपल्या देशाचा, राज्याचा आणि पर्यायाने आपल्या समाजाचा विकास करावा यासाठी महाराष्ट्र सरकारकडून शिष्यवृत्ती (Scholarship) जाहीर करण्यात येते. महाराष्ट्र सरकारच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे (OBC Development Department, Govt of Maharashtra) विमुक्त जाती-भटक्या जमाती, इतर मागास वर्ग, विशेष मागास प्रवर्ग  या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती (Foreign Education) देण्यात येते. 2022-23 या आर्थिक वर्षात परदेश शिष्यवृत्तीसाठी 23 जून सायंकाळी 6.15 पर्यंत विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तरी इच्छुकांनी दिलेल्या वेळेत अर्ज करावेत, असे आवाहन महाराष्ट्र सरकारतर्फे करण्यात आले आहे.

परदेश शिष्यवृत्तीसाठी अटी व शर्ती 

  • विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा. 
  • विद्यार्थ्यांच्या पालकांचे किंवा संपूर्ण कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु.8 लाखापेक्षा जास्त नसावे.
  • शिष्यवृत्ती द्यावयाच्या एकूण जागेपैकी 30% जागेवर मुलींची निवड करण्यात येईल.
  • विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेली परदेशातील शिक्षण संस्था ही जागतिक क्रमवारीत (Time Higher Education) आणि जगभरातील नामांकित विद्यापीठामध्ये  (QS World University Ranking) मध्ये 200 च्या आतील असावी.

परदेशी शिष्यवृत्तीचे स्वरूप 

  • विद्यापीठाने प्रमाणित केलेल्या शिक्षण शुल्काची पूर्ण रक्कम देण्यात येईल. 
  • विद्यापीठाच्या निकषानुसार वैयक्तिक आरोग्य विमा खर्च देण्यात येणार आहे.
  • विद्यार्थ्यास वार्षिक निर्वाह भत्ता परदेशातील संबंधित शैक्षणिक संस्थेने ठरवून दिलेल्या किंवा भारत सरकारच्या DOPT विभागाने ठरवून दिलेल्या दराप्रमाणे किंवा महाराष्ट्र सरकार वेळोवेळी जाहीर करेल ती रक्कम निर्वाह भत्ता म्हणून विद्यार्थ्यांना मिळणार आहे. 
  • विद्यार्थ्यांना परदेशात जाताना व अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर परत येताना विमान खर्च देखील मिळणार आहे.

संबंधित विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचा अर्ज संचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, पुणे - 1 या पत्त्यावर 23 जून, 2022 पर्यंत पाठवायचा आहे. शिष्यवृत्तीचा शासन निर्णय आणि अधिक सविस्तर माहितीसाठी https://obcbahujankalyan.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्या.

image source - https://bit.ly/3wFTaq8