मुंबई विभागीतील 4,083 घरांसाठी अर्ज करण्याची जाहिरात आज (दि. 22 मे) दुपारी 3.00 वाजता प्रसिद्ध होणार आहे. दुपारी जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून इच्छुकांना लगेच तीन वाजल्यापासून अर्ज करता येणार आहे. जे इच्छुकदार मुंबईतील घरांसाठी प्रथमच अर्ज भरणार आहेत; त्यांनी सर्वप्रथम रजिस्टर नोंदणी करून घेणे गरजेचे आहे.
म्हाडाच्या वेबसाईटवर आज दुपारी 3.00 वाजता मुंबईतील 4,083 घरांसाठीची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. जाहिरात भरण्याचा किंवा अर्ज स्वीकारण्याचा कालावधी 26 जूनपर्यंत असणार आहे. अर्ज भरल्यानंतर RTGS आणि NEFT द्वारे 28 जूनपर्यंत डिपॉझिट रक्कम भरू शकतात. संपूर्ण डिपॉझिट रक्कम भरल्याशिवाय अर्ज स्वीकारला जाणार नाही.
साडेचार वर्षानंतर म्हाडाची मुंबईसाठी सोडत
म्हाडाने 2019 मध्ये कोरोनाच्या पूर्वी अवघ्या 217 घरांसाठी लॉटरी काढली होती. आता मात्र म्हाडाने तब्बल साडेचार वर्षानंतर 4,083 घरांसाठी लॉटरी काढण्याचा निर्णय घेतला आहे. एकूण 4,083 घरांपैकी 2788 घरे ही अत्यल्प गटासाठी, 1022 घरे अल्प गटासाठी 132 घरे मध्यम गटासाठ आणि 38 घरे उच्च गटासाठी राखीव असणार आहेत. तसेच 102 घरे ही विखुरलेली असून ती वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या गटातील असण्याची शक्यता आहे.
अर्ज भरताना घाई करू नका!
अर्ज भरताना संबंधित व्यक्तीकडे सर्व कागदपत्रे, पुरावे आहेत का? याची खात्री करून घ्या. तसेच अर्ज भरताना अर्जदाराचे नाव, पत्ता आणि कामाची माहिती योग्य भरा. अर्जात चुकीची माहिती आढळल्यास अर्ज बाद होऊ शकतो आणि तु्म्ही प्रक्रियेतून बाहेर पडू शकता. नोंदणी केलेल्या अर्जाची आणि भरलेल्या अनामत रकमेची पावती सांभाळून ठेवा.
म्हाडाची मुंबई विभागातील 4083 घरांसाठी 22 मे रोजी जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर लगेच इच्छुकांना अर्ज करता येणार आहे. पण अर्ज करण्यापूर्वी संबंधितांना म्हाडाची रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण करावी लागणार आहे. ही प्रक्रिया अगोदरच पूर्ण केली असेल तर पुढील अर्ज व्यवस्थितपणे भरता येऊ शकेल. चला तर मग जाणून घेऊयात म्हाडाच्या घरासाठी अर्ज भरण्यापूर्वी करावी लागणारी रजिस्ट्रेशनची प्रक्रिया कशी पार पाडायची.