Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

iPhone 15: नव्या वर्षात लाँच होणाऱ्या iphone 15 चे फीचर्स काय आहेत?

iphone 15 pro series

Image Source : www.indiatopday.com

Apple iPhone 15 Pro series launch: अॅपल लवकरच बाजारात, आयफोन 15 प्रो आणि आयफोन 15 प्रो मॅक्स हे फोन बाजारात आणणार आहे. या दोन्ही फोनचे फीचर्स काय असतील, त्यांची किंमत काय असेल या बाबी पुढे वाचा.

Apple’s flagship series of 2023: अॅपल या कंपनीच्या आयफोनला, स्मार्टफोनचा राजा म्हणून ज्याला अघोषित मान्यता मिळाली आहे. आतापर्यंत बाजारात 14 सिरीज आणल्या असून, आता मालिकेतील आयफोन 15 प्रो (iPhone 15 Pro) आणि आयफोन 15 प्रो मॅक्स (iPhone 15 Pro Max) या वर्षात लाँच होणार आहेत.

आयफोन 15 मधील फीचर्स (Features of iPhone 15)

अॅपलच्या आयफोन 15 प्रो (iPhone 15 Pro) आणि आयफोन 15 प्रो मॅक्समध्ये (iPhone 15 Pro Max) टायटॅनियम फ्रेम्स (Titanium frame ), हॅप्टिक (सेन्सर) फीडबॅकसह सॉलिड बटणे असणार आहेत. तर, एकावेळी मल्टीपल प्रोग्रॅम स्मुथली चालवता यावेत यासाठी रॅमची साईज वाढवण्यात येणार आहे. या फोनमध्ये थ्री-स्टॅक बॅक कॅमेऱ्यांचे अप्रेगेडेड व्हर्जन असणार आहे, ज्यात 48-मेगापिक्सलचा वाइड लेन्स असू शकते. तसेच मॉडेल ऑप्टिकल झूमसाठी टेलिफोटो लेन्सही असणार आहे. मुख्य म्हणजे यात लिडर स्कॅनर (LiDAR scanner) अर्थात रिमोट सेन्सिंग मेथड स्कॅनर असणार आहे. यासह, यात बायकॉनिक प्रोसेसर (Bionic processor ) असणापर आहे. यामुळे फोनचा वापर रिमोटप्रमाणे करता येऊ शकतो, ही माहिती नाइन टू फाईव्ह मॅकच्या (9To5Mac) अहवालात नमूद केलेले आहे.

अॅपल कंपनीची दुसरी रणनीती म्हणजे आयफोन 15 प्रो (iPhone 15 Pro) आणि आयफोन 15 प्रो मॅक्स (iPhone 15 Plus Pro Max) अधिक परवडणारी बनवणार अशी चर्चा सध्या बाजारात आहे. सध्या आयफोन 14 प्लसची (iPhone 14 Plus) सुरुवातीची किंमत 128GB स्टोरेज बेस प्ल मॉडेलसाठी 89 हजार 900 रुपये आहे, तर आयफोन 14 (iPhone 14) ची सुरुवातीची किंमत 79 हजार 900 रुपये आहे.  आधीच्या फोनच्या  तुलनेत नेमकी किंमत काय ठरवण्यात येईल, फोन स्वस्त म्हणजे पॉकेट फ्रेंडली असेल का, असे प्रश्न ग्राहकांच्या आयफोन प्रेमींच्या मनात आहेत. या नव्या फोनबद्दल ग्राहकांच्या मनात खूप उत्सुकता दिसून येत आहे.