Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Anubhav Singh Bassi Update: अनुभव सिंग बस्सी हे नाव अचानक ट्रेंडमध्ये, जाणून घ्या कोण आहे व त्याच्या लग्झरी लाइफविषयी

Who Is Anubhav Singh Bassi

Image Source : http://www.thehindu.com/

Who Is Anubhav Singh Bassi: अनुभव सिंग बस्सी हे नाव अचानक मागील काही दिवसांमध्ये ट्रेंडमध्ये येत आहे. एका बाॅलीवुड चित्रपटाचा ट्रेलर प्रसिध्द झाला व त्यामध्ये तो दिसला आणि मग त्याच्या या नावाची चर्चा सुरू झाली. चला, तर मग पाहुयात अनुभव सिंग हा नक्की कोण आहे व त्याच्या कारकीर्दीविषयी...

Anubhav Singh Bassi Movie: अभिनेता रणबीर कपूरसोबत (Ranbir Kapoor) अनुभव सिंग बस्सी एका बाॅलिवुड चित्रपटात झळकणार आहे. हा त्याचा पहिलाच चित्रपट असणार आहे. सोशलमिडीयावर या कलाकाराचे जबरदस्त फॅन फॉलोइंगदेखील आहे. ‘तू झूठी मै मक्कार’ (Tu Jhooti Main Makkar) या चित्रपटाचा ट्रेलर लाॅन्च झाला आणि लगेच ‘अनुभव सिंग बस्सी’ (Anubhav Singh Bassi)  हे नाव ट्रेंडमध्ये आले आहे.  चला, तर मग पाहुयात अनुभव सिंग कोण आहे व त्याच्या कारकीर्दीविषयी... 

अनुभव सिंग बस्सी कोण आहे (Who is Anubhav Singh Bassi)

अनुभव सिंग हा एक प्रसिध्द स्टॅंड अप काॅमेडियन आहे. सोशलमिडीयावर याचे जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. नुकताच ‘तू झूठी मै मक्कार’ या चित्रपटाचा ट्रेलर लाॅन्च झाला आणि लगेच अनुभव सिंग बस्सी हे नाव ट्रेंडमध्ये आले.  अनुभव सिंग बस्सी हा बाॅलिवुड चित्रपटातून पदापर्ण करत आहे. या चित्रपटात तो अभिनेता रणबीर कपूरसोबत झळकणार आहे. या चित्रपटात तो रणबीर कपूरच्या मित्राची भूमिका साकारताना दिसणार आहे. तसेच या चित्रपटात श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) देखील मुख्य भूमिकेत असणार आहे. या चित्रपटात त्याचीदेखील महत्वाची भूमिका असून काॅमेडी स्वरूपात पाहायला मिळणार आहे. 

फॅन फॉलोइंग लाखात (Millions of Fan Followings) 

अनुभव सिंह बस्सी हा एक स्टॅंड अप काॅमेडीचा बादशाह आहे. आतापर्यंत त्यांनी 35 शहरात आपल्या कलेचा धमाका दाखविला आहे. तसेच तो परदेशातदेखील शो करत असतो. या काॅमेडियनचे शो नेहमी हाउसफूल असतात. याची काॅमेडी एेकण्यास प्रेक्षक जगाच्या कानाकोपऱ्यातून येतात. सोशलमिडीयावर याचे फॅन फॉलोइंगदेखील तगडी म्हणजे लाखात आहे. 

अनुभव सिंग बस्सी विषयी (About Anubhav Singh Bassi)

अनुभव सिंग बस्सीचा जन्म 9 जानेवारी 1991 रोजी झाला. तो मूळचा उत्तर प्रदेश जिल्हयातील मेरठ शहराचा आहे. 2015 मध्ये त्याने डाॅ. राम मनोहर लोहिया नॅशनल लाॅ विदयापीठातून ‘वकील’ या पेशात पदवी संपादन केली आहे. तसेच त्याने युपीएससीचादेखील अभ्यास केला आहे. काॅमेडीला त्याने फक्त सुरूवात केली मात्र त्याच्या या कलेने त्याचे करियरच बदलले. 

स्वत:चे युटयूब चॅनल (Own YouTube Channel)

अनुभव सिंग बस्सी याचे स्वत:चे युटयुब चॅनल आहे. ज्यावर 3 लाखापेक्षा ही अधिक युजर्सने सब्सस्क्राइब केले आहे. तसेच इंस्टाग्रामवर एक लाखापेक्षा ही अधिक फॅन फॉलोवर्स आहेत. त्याचे चिटिंग, वॅक्सिंग व हाॅस्टेल या विषयावर अधिक व्हिडिओज् आहेत. त्याने 2017 मध्ये स्टॅड अप काॅमेडियनला सुरूवात केली होती. पहिल्यांदा त्याने ओपन माइक परफाॅर्मेंन्स दिले होते. ज्या व्हिडीओला 200 लाखापेक्षा अधिक युजर्सने पाहिले होते. बस्सी याने एक शो होस्ट केला होता, ज्यामध्ये त्याने कपिल शर्मा (Kapil Sharma)ची मुलाकत घेतली होती. 

संपत्ती (Wealth)

2023 च्या रिपोर्टनुसार, अनुभव सिंग बस्सी याच्याकडे 16 कोटींची संपत्ती असल्याचे सांगितले जात आहे. त्याची लाइफस्टाइल ही जास्त लॅविश आहे. त्याच्याजवळ बंगला, लक्झरी कारर्स सर्वकाही आहे. तसेच त्याला 2021 साली ग्लोरी अवॉर्ड्सच्यावतीने ‘यूथ आइकन ऑफ द ईयर’चा अवॉर्डदेखील मिळाला आहे.