Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

EPFO Higher Pension: भविष्य निर्वाह निधीमध्ये वाढीव पेन्शनसाठी अर्ज करण्यासाठी पुन्हा मुदतवाढ, घाई करा!

EPFO Higher Pension

कर्मचार्‍यांना उच्च पेन्शनसाठी अर्ज करण्यासाठी EPFO ​​ने तीनदा मुदतवाढ दिली आहे. शहरी भागातील कर्मचाऱ्यांपेक्षा ग्रामीण भागातील कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे असे EPFO ला जाणवले आहे. वाढीव पेन्शन योजनेचा लाभ सर्व कर्मचाऱ्यांना घेता यावा आणि वेळेत त्यांना कागदपत्रांची जुळवाजुळव करता यावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ने त्यांच्या सभासदांसाठी एक मोठी घोषणा केलीये. ज्या कर्मचाऱ्यांना वाढीव निवृत्ती वेतन मिळवण्यासाठी अजूनही अर्ज करता आला नाही, त्यांच्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 जून होती, ती वाढवून 11 जुलै करण्यात आली होती. मात्र आता यात पुन्हा मुदतवाढ दिली गेली असून कर्मचारी 30 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज करू शकणार आहेत.

पेन्शनसाठी पात्र असलेल्या सभासदांना अर्ज कसा करावा, कोणती कागदपत्रे जमा करावीत, वाढीव पेन्शनचा पर्याय कसा स्वीकारावा यासारख्या अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच अनेक कर्मचाऱ्यांनी वाढीव पेन्शनसाठी अर्ज केला आहे मात्र त्यांनी त्यांचे वेतन तपशील पोर्टलवर अपलोड केलेले नाहीये. अशा कर्मचाऱ्यांना 30 सप्टेंबर 2023 पर्यंतची मुदत दिली जाणार असून. या कालावधीत त्यांनी त्यांचे वेतन तपशील आणि आवश्यक कागदपत्रे सादर करावीत असे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने म्हटले आहे.

आतापर्यंत तीन वेळा मुदतवाढ

कर्मचार्‍यांना उच्च पेन्शनसाठी अर्ज करण्यासाठी EPFO ​​ने तीनदा मुदतवाढ दिली आहे. शहरी भागातील कर्मचाऱ्यांपेक्षा ग्रामीण भागातील कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे असे EPFO ला जाणवले आहे. वाढीव पेन्शन योजनेचा लाभ सर्व कर्मचाऱ्यांना घेता यावा आणि वेळेत त्यांना कागदपत्रांची जुळवाजुळव करता यावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच या महिन्यात आयकर विवरण भरण्यासाठी देखील कर्मचाऱ्यांची लगबग सुरु आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आयकर भरण्यासाठी आणि पेन्शनबाबतच्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून पुन्हा एकदा, तिसऱ्यांदा मुदतवाढ दिली गेली आहे.

शेवटची संधी 

वाढीव पेन्शन मिळवण्यासाठी कर्मचाऱ्यांना ही शेवटची संधी असेल असे मानले जात आहे. कर्मचाऱ्यांना त्यांच्या निवृत्तीनंतर मिळणाऱ्या पेन्शनमध्ये वाढ व्हावी असे वाटत असेल तर ते पेन्शन फंडातील रक्कम वाढवू शकतात. जेणेकरून त्यांना पेन्शन अधिक मिळेल.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ( EPFO ) सदस्यांना निवृत्तीनंतर पेन्शन मिळते. सध्या, कर्मचारी आणि नियोक्ते त्यांच्या मूळ पगाराच्या आणि महागाई भत्त्याच्या 12% EPF मध्ये योगदान देतात. कर्मचाऱ्याच्या 12% योगदानापैकी 8.33% रक्कम ही कर्मचारी पेन्शन योजनेत ( Employee Pension Scheme ) आणि 3.67% EPF (Employee Pension Fund) योजनेत गुंतवली जाते. तसेच नियमानुसार 8.33% EPS योगदान कमाल रक्कम रु. 15,000 पर्यंत मर्यादित आहे.

ज्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या EPF मधील रक्कम वाढवायची आहे आणि वाढीव पेन्शन मिळवायची आहे त्यांच्यासाठी अर्ज करण्याची ही शेवटची संधी असणार आहे.