Elin Electronics IPO: फ्रॅक्शनल हॉर्सपॉवर मोटर्स बनवणारी सर्वांत मोठी कंपनी शुमार एलिन इलेक्ट्रॉनिक्स (Elin Electronics) कंपनीचा आयपीओ पुढील आठवड्यात 20 डिसेंबरला ओपन होणार आहे. या आयपीओची एकूण किंमत 475 कोटी रुपये असून त्यातून 150 कोटी रुपयांचे नवीन इक्विटी शेअर्स विकले जाणार आहेत. तर उर्वरित 300 कोटी रुपयांचे शेअर्स हे ऑफर फॉर सेल (Offer for Sale-OFS) अंतर्गत विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत.
एलिन इलेक्ट्रॉनिक्स कंपनी सुरूवातीला 760 कोटी रुपयांचा आयपीओ (Initial Public Offer-IPO) आणणार होती. पण कंपनीने त्यात कपात करून त्याची किंमत 475 कोटी रुपये निश्चित केली. हा आयपीओ पुढील आठवड्यात 20 डिसेंबरला ओपन होणार असून 22 डिसेंबरपर्यंत गुंतवणूक करता येणार आहे. या आयपीओचो प्राईस बॅण्ड 234-247 रुपये अशी ठरवण्यात आली असून याच्या एका लॉटमध्ये 60 शेअर्स असणार आहेत. प्राईस बॅण्डच्या अप्पर किमतीचा विचार करता या आयपीओत गुंतवणूक करण्यासाठी संबंधित गुंतवणूकदाराला किमान 14,820 रुपये गुंतवावे लागतील.
एलिन इलेक्ट्रॉनिक्सच्या आयपीओमधील 50 टक्के हिस्सा हा क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल बायर्स (पात्र संस्थात्मक खरेदीदार) (Qualified Institutional Buyer-QIB), 15 टक्के भाग नॉन इन्स्टिट्यूशनल इन्वेस्टर्स (गैर संस्थात्मक गुंतवणूकदार) (Non-Institutional Investors-NII) आणि 35 टक्के हिस्सा किरकोळ गुंतवणूकदारांसाठी आरक्षित आहे.
या आयपीच्या शेअर्सचे अलॉटमेंट 27 डिसेंबरला अंतिम होणार असून याचे लिस्टिंग 30 डिसेंबरला होण्याची शक्यता आहे. याच्या प्रत्येक इश्यूची फेस व्हॅल्यू 5 रुपये आहे. तसेच या आयपीओच्या माध्यमातून जमा झालेल्या निधीतून कंपनी सध्याचे कर्ज फेडण्यासाठी वापरणार आहे. तर 37.59 कोटी रुपयांचा वापर कंपनी उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद आणि गोवा राज्यातील प्लान्ट अपग्रेड करण्यासाठी आणि त्याचा विस्तार करण्यासाठी वापरणार आहे.
एलिन इलेक्ट्रॉनिक्स कंपनीबाबत!
एलि इलेक्ट्रॉनिक्स कंपनी ही इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिसेस सेवा देणारी नावाजलेली कंपनी आहे. ही कंपनी देशातील महत्त्वाच्या लाईट कंपनी, फॅन आणि घरगुती वापराच्या ब्रॅण्डसला सेवा देते. 2021-22 मध्ये कंपनीला एकूम 1093.75 कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता.
त्याच्या एक वर्ष अगोदर कंपनीचा महसूल फक्त 862.38 कोटी रुपये एवढाच होता. पण कंपनीने खूपच कमी कालावधीत चांगला नफा मिळवला आहे. सप्टेंबर 2022 पर्यंत उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार, कंपनीवर 102.42 कोटी रुपये कर्ज होते.