मागील काही दिवसांपासून भांडवली बाजार नियामक सेबीनं (Securities and Exchange Board of India) विविध संस्थांवर कारवाई केली. या संस्थांमधला व्यवहार अयोग्य पद्धतीनं होत असल्याचं निदर्शनास आलं होतं. आता त्यात आणखी 11 संस्थांची भर पडलीय. सेबीनं या 11 संस्थांना 55 लाख रुपयांचा दंड केलाय. संबंधित संस्थांनी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजवरच्या (BSE) ई-लिक्विड स्टॉक ऑप्शन्स सेगमेंटमध्ये चुकीच्या पद्धतीनं व्यवहार केले आहेत. यामुळे त्यांच्यावर कारवाईच्या स्वरुपात 55 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय, असं सेबीनं म्हटलं. सेबीनं या 11 संस्थांना स्वतंत्र आदेश जारी केले आहेत. सर्वांना प्रत्येकी 5 लाख रुपयांचा दंड असणार आहे.
Table of contents [Show]
कोणत्या संस्था?
या 11 संस्थांमध्ये शिल्पा छाबरा, श्रेया कुमारी, शरद शिवनारायण कासट, श्री कृष्ण गोयल एचयूएफ (HUF), शैलेश सिंग प्रेमसिंग नेगी, शशांक टेकरीवाल, शीतल गुप्ता आणि श्री राम कमोडिटीज यांचा समावेश आहे. याशिवाय बाजार नियामक सेबीनं रायसोनी सिक्युरिटीज, वेल्किन इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट्स आणि शंकर बार्टर प्रायव्हेट लिमिटेड यांच्यावरही दंडात्मक कारवाई करण्यात आलीय.
उलटसुलट व्यवहार
सिक्युरिटीज एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाला बीएसईवर ई-लिक्विड स्टॉक ऑप्शन्समध्ये प्रचंड प्रमाणात उलटसुलट व्यवहार निदर्शनास आले होते. यामुळे एक्स्चेंजमध्ये आर्टिफिशिअल व्हॉल्यूम तयार होऊ लागले होते. मार्केट रेग्युलेशननं एप्रिल 2014 ते सप्टेंबर 2015 या कालावधीत काही संस्थांच्या व्यापार विषयक सर्व कार्यपद्धतीचं परीक्षण केलं. यासर्वांच्या तपासाअंती गैरव्यवहार झाल्याचं सेबीला आढळून आलं.
पीएफयूटीपी नियमांचं उल्लंघन
या त्याच 10 संस्था आहेत ज्यांनी रिव्हर्सल ट्रेड्सच्या प्रोसिजरमध्ये भाग घेतला होता. रिव्हर्सल ट्रेडचं स्वरूप कथितरित्या चुकीचं असतं. कारण सर्व व्यवहार सामान्य असल्याप्रमाणं चालवलं जातं. आर्टिफिशिअल व्हॉल्यूममध्ये ट्रेडिंग करत असताना दिशाभूल करणारे आणि खोटे प्रमाण दाखवण्यात येतं. अशापद्धतीनं 5 जणांनी पीएफयूटीपी (Prohibition of Fraudulent and Unfair Trade Practices) नियमांचं उल्लंघन केलंय.
सेबीनं जारी केले होते 10 वेगवेगळे आदेश
बाजार नियामक सेबीनं 10 वेगवेगळे आदेश जारी केले होते. ऑरोप्लस मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड, बाबा आयर्न इंडस्ट्रीज, अटलांटिक इन्व्हेस्ट अॅडव्हायझरी, अविनाश व्ही. मेहता एचयूएफ, नवनीत अग्रवाल अँड सन्स एचयूएफ, नीरज गांधी एचयूएफ आणि अथवानी श्रीचंद यांना प्रत्येकी 5 लाख रुपयांचा दंड ठोठावलाय. तर अलिकडेच 5 संस्थांना चुकीचं ट्रेडिंग केल्याचा ठपका ठेवत सेबीनं दंड ठोठावला होता. त्यातल्या एका संस्थेवर तर 6 महिन्यांची बंदीही घातली.
पैसे परत करण्याचे दिले होते आदेश
चित्राबाई वसंतराव निकम, नेमीचंद कस्तुरचंद जैन, चंद्र लक्ष्मी सेफ्टी ग्लास लिमिटेड, नरेश कुमार अग्रवाल, दमयंती झुनझुनवाला अशा या 5 संस्था होत्या. एप्रिल 2014 ते सप्टेंबर 2015 या कालावधीत त्यांच्या ट्रेडिंगची तपासणी सेबीनं केली. त्याआधी 7 संस्थांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. आता तर तब्बल 11 संस्थांचा गैरव्यवहार सेबीनं समोर आणला आहे. 6 महिन्यांची बंदी असलेल्या संस्थेला तर गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याचे आदेशच सेबीनं दिले होते.