आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आणि रिलायन्स समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि त्यांची पत्नी नीता अंबानी (Nita Ambani) यांनी मुंबईतील जिओ पार्क येथे एक भव्य कल्चर सेंटर उभारले आहे. ज्याचे नाव 'नीता मुकेश अंबानी कल्चर सेंटर' (MMACC) असे ठेवण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या ओपनिंग सेरेमनीला जगभरातील कलाकारांनी हजेरी लावली होती.
कार्यक्रमाच्या पहिल्याच दिवशी नीता अंबानींनी सादर केलेल्या नृत्यामुळे कार्यक्रमाला चार चांद लागले. कार्यक्रमाचा दुसरा दिवस मात्र अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंटमुळे (Radhika Merchant) चांगलाच चर्चेत राहिला. त्याचं कारण होतं, अनंत अंबानी यांनी घातलेले सुपर ब्रँडेड घड्याळ आणि राधिका मर्चंटची ब्रँडेड मिनी पर्स. या घड्याळाची आणि मिनी पर्सची किंमत ऐकून तुम्ही देखील थक्क व्हाल.
सुपर ब्रँडेड घड्याळ आणि ब्रँडेड मिनी पर्स
नीता मुकेश अंबानी कल्चर सेंटरच्या (NMACC) दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमात छोटे अंबानी म्हणजेच अनंत अंबानी आणि त्यांची भावी पत्नी राधिका मर्चंट उपस्थित होते. यावेळी दोघांनीही काळ्या रंगाचे कपडे परिधान केले होते. अनंत अंबानींनी ब्लॅक आऊटफिटवर घातलेले ब्रँडेड घड्याळ सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते. तर राधिका मर्चंटने हातात घेतलेली मिनी पर्सही आकर्षणाचा विषय ठरली होती.
अनंत अंबानी यांनी घातलेले Chime Watch एडिशनचे ‘Patek Philips’ या ब्रँडचे हे घड्याळ महागड्या घड्याळांपैकी एक आहे. म्हणूनच याला ‘सुपर लग्झरी वॉच’ (Super Luxury Watch) म्हणतात. या लग्झरी घड्याळाची किंमत चक्क 18 कोटी रुपये आहे. या घड्याळाचा लुक साधा पण रॉयल आहे. हीच याची खरी खासियत आहे. अनंत अंबानींना लग्झरी वॉच कलेक्शन आणि कार कलेक्शनचा खास शौक आहे.
राधिका मर्चंटने हातात पकडलेली मिनी पर्स देखील चांगलीच चर्चेत राहिली. सिल्व्हर रंगाची ही मिनी पर्स ‘Hermes Kellymorphose’ या ब्रँडची आहे. आकाराने ही पर्स अगदी लहान दिसत असली तरीही तिची किंमत लाखांमध्ये आहे. राधिकाच्या या पर्सची किंमत 52 लाख 30 हजार रुपये असल्याचे सांगितले जाते.