Cartier Panthere Brutch Price: अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या साखरपुडयाला आठवला झाली तरी, त्यांच्या साखरपुडयाची चर्चा कोणत्या ना कोणत्या कारणाने होत आहे. आता अनंत अंबानी यांच्या कपडयावरील ‘कार्टियर पॅंथर ब्रोच’ (Cartier Panthere Brooch Price) ची चर्चा जोरात सुरू आहे. या छोटयाशा ब्रोचशी किंमत एेकून तुम्ही ही आश्चर्य व्यक्त कराल.
कार्टियर पॅंथर ब्रोचची किंमत (Cartier Panthere Brutch Price)
अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचे साधारण एक आठवडयापूर्वी साखरपुडा झाला आहे. हे दोघे ही लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. आता त्यांच्या साखरपुडयाचे काही फोटो सोशलमिडीयावर तुफान व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये अनंत अंबानी यांच्या कपडयावरील ब्रोंचने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. हे कार्टियर पॅंथर ब्रोच आहे. या ब्रोचची किंमत साधारण 1 कोटी 13 लाख 51 हजार 87 रूपयांपासून ते 1 कोटी 32 लाख 26 हजार 85 रूपयांपर्यंत आहे. सांगितले जात आहे की, त्याच्या या ब्रोचची किंमत 1 कोटी 13 लाख ते 1 कोटी 32 लाख रूपये दरम्यान असावी.
ब्रोचची खासियत (Specialty of Brutch)
कार्टियर पॅंथर ब्रोच हा प्लॅटिनम किंवा सोन्यापासून बनविण्यात येतो. या ब्रोचला हिऱ्यांना सजविले जाते. तसेच पॅंथरचे डोळे ही पाचूपासून बनविले जाते. या पॅंथर ब्रोचची रचना जॅक कार्टियर यांनी 1914 मध्ये केली होती. कार्टियरच्या तिसऱ्या पिढीतील वंशज आहेत.
राधिका मर्चंट आउटफीट (Radhika Merchant Outfit)
राधिका मर्चंट हिने साखरपुडयात घातलेल्या आउटफीटचीदेखील सोशलमिडीयावर जोरदार चर्चा झाली होती. तिने लोकप्रिय डिझायनर अबू जानी व संदीप खोसला यांनी डिझाइन केलेला सुंदर असा सिल्क टिश्यू घागरा घातला होत. तिच्या घागऱ्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.