Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Post Office RD: दरमहा 10 हजार रुपयांची गुंतवणूक करून 5 वर्षात मिळेल चांगला रिटर्न

Post Office RD

Post Office RD: पोस्ट ऑफिसच्या अनेक योजना अशा आहेत, ज्यातून उत्तम परतावा मिळतो आणि सर्वसाधारण कुटुंबातील व्यक्ती सुद्धा त्यात गुंतवणूक करू शकतो. 1 जानेवारी 2023 पासून, पोस्ट ऑफिसच्या RD वर वार्षिक 5.8 टक्के व्याज मिळत आहे.

Post Office RD: गावातील मजुरी करणाऱ्या महिलांच्या तोंडातून आठवड्याच्या शेवट ऐकू येणारे शब्द म्हणजे भिशी, बचत गट , RD भरायची आहे हेच असतात. त्यांनी कमावलेल्या पैशातून काही भाग त्या महिला यात गुंतवणूक करतात. त्याच गुंतवणुकीतून अनेक महिलांनी आपल्या मुलांचे शिक्षण पूर्ण केले आहे. काहींनी आपल्या मुलींचे लग्नसुद्धा त्यातूनच केले आहे. तर जाणून घेऊया पोस्ट ऑफिस RD तुम्हाला कशी उपयोगी पडते? आणि किती परतावा मिळवता येऊ शकतो. 

जे लोक दर आठवड्याला, महिन्याला गुंतवणूक करतात त्यांना माहित आहे की, आपण 1 रुपयापासूनही गुंतवणूक सुरू करू शकतो. पोस्ट ऑफिसच्या अनेक योजना अशा आहेत, ज्यातून उत्तम परतावा मिळतो आणि सर्वसाधारण कुटुंबातील व्यक्ती सुद्धा त्यात गुंतवणूक करू शकतो. 1 जानेवारी 2023 पासून, पोस्ट ऑफिसच्या RD वर वार्षिक 5.8% व्याज मिळत आहे.

किती मिळू शकतो परतावा? 

यामध्ये व्याजाची चक्रवाढ तिमाही आधारावर केली जाते. पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट (PORD) ची मॅच्युरिटी पाच वर्षांची असते आणि ती एकदा 5 वर्षांसाठी वाढवता येते. म्हणजेच तुम्ही तुमचे खाते 10 वर्षे चालवू शकता. पोस्ट ऑफिसमध्ये ठेवींवर कोणताही धोका नाही आणि तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित राहतील.

दरमहा रक्कम कालावधी परतावा रक्कम व्याज 
100005 वर्ष6,96,968 96,968

दुसरे म्हणजे, जर तुम्ही मासिक योजनेत दरमहा 10,000 रुपये जमा केले आणि मुदतपूर्तीनंतर ते आणखी 5 वर्षे वाढवले, तर 10 वर्षांनंतर तुमच्याकडे 16,26,476 रुपयांचा हमी निधी असेल. यामध्ये तुमची गुंतवणूक 12 लाख रुपये असेल. तर, व्याजातून मिळणारे उत्पन्न 4,26,476 रुपये असेल.

म्हणजेच मुलीच्या जन्मापासून जर तुम्ही यात गुंतवणूक सुरू केली तर 25 वर्षात मुलींच्या लग्नाला लागणारा खर्च तुम्ही सहज जमा करू शकता. दरमहा 10 हजार रुपये तुम्हाला कठीण जात असेल तर तुम्ही कमी रकमेत सुद्धा चांगला परतावा मिळवू शकता. 

RD खात्यावरही तुम्ही कर्ज घेऊ शकता? 

पोस्ट ऑफिसमधील आरडी खात्यावरही तुम्ही कर्ज घेऊ शकता. नियम असा आहे की 12 हप्ते जमा केल्यानंतर खात्यात जमा केलेल्या रकमेच्या 50% पर्यंत कर्ज घेता येते. कर्जाची परतफेड एकरकमी किंवा हप्त्यांमध्ये करता येते. कर्जाचा व्याजदर आरडीवरील व्याजापेक्षा 2 टक्के जास्त असते. त्यात नॉमिनेशनचीही सोय आहे. पोस्ट ऑफिस आरडी खात्याची परिपक्वता 5 वर्षे आहे. परंतु, प्री-मॅच्युअर क्लोजर 3 वर्षांनी करता येऊ शकतो. 

(News Source: https://www.zeebiz.com)