• 06 Jun, 2023 19:30

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Amazon investment in India : क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये अ‍ॅमेझॉन भारतात करणार 1,05,600 कोटी रुपयांची गुंतवणूक!

Amazon investment in India : क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये अ‍ॅमेझॉन भारतात करणार 1,05,600 कोटी रुपयांची गुंतवणूक!

Amazon investment in India : अ‍ॅमेझॉन क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर भारतात मोठी गुंतवणूक करणार आहे. अ‍ॅमेझॉन वेब सर्व्हिसेसनं 2030पर्यंत भारतात क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये तब्बल 12.7 अब्ज डॉलर गुंतवण्याची योजना आखलीय. क्लाउड सेवांसाठी ग्राहकांची मागणी वाढलीय. या वाढत्या मागणीची पूर्तता करण्याचं उद्दिष्ट समोर ठेवण्यात आलंय.

अ‍ॅमेझॉनचं क्लाउड कॉम्प्युटिंग युनिट अ‍ॅमेझॉन वेब सर्व्हिसेस (Amazon Web Services) यांनी याविषयी माहिती दिलीय. भारतातल्या डेटा सेंटर्सच्या पायाभूत सुविधांमध्ये (Infrastructure) गुंतवणूक करण्याचा आमचा प्रयत्न आहे. या माध्यमातून भारतीय व्यवसायात दरवर्षी सरासरी 1,31,700 नोकऱ्या निर्माण होण्याची आम्हाला आशा आहे. भारतातील बांधकाम, सुविधा-देखभाल, अभियांत्रिकी, दूरसंचार आणि इतर नोकऱ्यांसह डेटा केंद्रे पुरवठा साखळीचा भाग बनतील, असं सांगण्यात आलंय.

जीडीपी वाढणार?

अ‍ॅमेझॉन वेब सर्व्हिसेसनं भारतातल्या क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये जवळपास 1,05,600 कोटी म्हणजेच 12.7 बिलियन अमेरिकन डॉलर गुंतवण्याची योजना आखलीय. देशातली तिची लॉंगटर्म कमिटमेंट 2030पर्यंत 1,36,500 कोटी म्हणजेच 16.4 बिलियन अमेरिकन डॉलरपर्यंत पोहोचणार आहे. यामुळे भारताचा जीडीपीही वाढणार असल्याचं बोललं जातंय. या गुंतवणुकीच्या माध्यमातून 2030पर्यंत भारताच्या एकूण जीडीपीमध्ये 1,94,700 कोटी म्हणजे 23.3 अब्ज अमेरिकन डॉलरची वाढ होईल, असा अंदाज वर्तवण्यात येतोय.

स्थानिक अर्थव्यवस्थेवर परिणाम

स्थानिक अर्थव्यवस्थेवर विविध क्षेत्रातल्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार आहे. वर्कफोर्स डेव्हलपमेंट, ट्रेनिंग आणि स्कील अपॉर्च्युनिटी, कम्युनिटी एंगेजमेंट, स्थिरता अशा या घटकांचा प्रभाव पडणार आहे, असं अ‍ॅमेझॉन वेब सर्व्हिसेसनं म्हटलंय. एडब्लूएस एशिया पॅसेफिक (मुंबई) सेक्टर आणि एडब्लूएस एशिया पॅसेफिक (हैदराबाद) सेक्टर हे कंपनीचे दोन डेटा सेंटर इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टर आहेत. यांचं लॉन्चिंग अनुक्रमे 2016 आणि 2022ला झालं.

दोन एडब्लूएस सेक्टर्स

दोन एडब्लूएस सेक्टर्स भारतीय ग्राहकांना अधिक उपलब्धतेसह वर्कलोड चालवण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहेत. भारतात डेटा सुरक्षितपणे संग्रहित करण्यासाठी प्रामुख्यानं याचा वापर होणार आहे. एडब्लूएसनं 2016 ते 2022 दरम्यान एडब्लूएस एशिया पॅसिफिक (मुंबई) क्षेत्रात 30,900 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केलीय. यामध्ये त्या प्रदेशातली डेटा केंद्रं तयार करणं, देखरेख करणं तसंच ऑपरेट करणं या दोन्हीशी संबंधित भांडवली आणि परिचालनाच्या खर्चाचा समावेश होतो.

डिजिटल इंडिया अंतर्गत उपक्रम

भारत सरकारच्या डिजिटल इंडिया अंतर्गत हा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. क्लाउड आणि डेटा केंद्रांचा विस्तार होणार आहे, असं केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान विभागानं म्हटलं. ही नवी गुंतवणूक भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना देणारी ठरेल. MeitY क्लाउडचं इनोव्हेशन, स्थिरता आणि विकास करण्याच्या हेतूने क्लाउड आणि डेटा सेंटर पॉलिसीवरही काम सुरू आहे, अशी माहिती देण्यात आली.

कंपनीचं सर्वेक्षण

भारतातील लाखो ग्राहक आपला खर्च वाचवण्यासाठी, इनोव्हेशन अधिक फास्ट होण्यासाठी तसंच बाजारपेठेचा वेग वाढवण्यासाठी त्यांचं वर्कलोड एडब्लूएसवर चालवतात. सर्वेक्षणाअंती कंपनीला हे आढळून आलंय. यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयासारख्या सरकारी संस्था, आरोग्यश्री हेल्थ केअर ट्रस्ट यासारख्या सार्वजनिक आरोग्य संस्था, अशोक लेलँड, अ‍ॅक्सिस बँक, एचडीएफसी लाइफ आणि टायटन यासारख्या मोठ्या भारतीय उद्योग, हॅवमोर, क्यूब यासारख्या लहान आणि मध्यम व्यवसायांचा समावेश आहे. सिनेमा आणि नारायण नेत्रालय, प्रसिद्ध स्टार्ट-अप जसं की बँकबझार (BankBazaar), हायर प्रो (HirePro), एमटूपी (M2P) आणि युबी (Yubi) यांचा समावेश होतो.