अॅमेझॉन (Amazon) ही एक ई-कॉमर्स (E Commerce) कंपनी आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मदेखील आपल्या यूझर्सना कंपनी उपलब्ध करून देते. या अंतर्गत मनोरंजनाचं एक महत्त्वाचं साधन यूझर्ससाठी निर्माण झालं. वाढती मागणी पाहता आता अॅमेझॉननं आपल्या पॅकेजेसमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केलीय. अॅमेझॉनच्या या किंमतीनं नेटफ्लिक्सलाही (Netflix) मागं टाकलंय. ही प्राइम मेंबरशीपच्या (Prime membership) किंमतीतली वाढ भारतासाठी असणार आहे. मासिक आणि तीन महिन्यांच्या प्लॅनमध्ये वाढ करण्यात आलीय. मंथली आणि 3 महिन्याच्या प्लॅनमध्ये 140 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आलीय. मंथली प्लॅनची किंमत आता 299 रुपये इतकी असणार आहे. 3 महिन्यांच्या प्लॅनची किंमत जवळपास 599 रुपये इतकी करण्यात आलीय. वार्षिक सदस्यत्व शुल्क मात्र 1,499 रुपये इतकंच कायम ठेवण्यात आलंय.
Table of contents [Show]
प्राइम लाइट मेंबरशीप
कंपनीनं आपल्या प्राइम लाइट सदस्यत्वाची किंमत 999 रुपये इतकी ठेवलीय. रेग्यूलर मेंबरशीपचे बहुतेक फायदे या प्राइम लाइट मेंबरशीपमधून मिळतात. केवळ अॅमेझॉन म्यूझिकचं सबस्क्रीप्शन मात्र यात मिळत नाही. अॅमेझॉन प्राइम सबस्क्रिप्शनची किंमत आधी एका महिन्यासाठी 179 रुपये आणि 3 महिन्यासाठी 459 रुपये होती. कंपनीनं मासिक प्लॅनची किंमत 60 टक्क्यांहून अधिक प्रमाणात वाढवलीय. तर तीन महिन्यांसाठी जवळपास 30 टक्क्यांची वाढ यात करण्यात आलीय.
7 things to know about Amazon Prime membership price hikehttps://t.co/5xJgnalzEL
— Gadgets Now (@gadgetsnow) April 27, 2023
अॅमेझॉन की नेटफ्लिक्स?
अॅमेझॉन की नेटफ्लिक्स असा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला इथे दोन्ही प्लॅटफॉर्मवरच्या पॅकेजेसची माहिती देत आहोत. यावरून तुम्हाला योग्य ती निवड करण्यास सोपं जाईल. भारतात नेटफ्लिक्सची मेंबरशीप मोबाइलसाठी 149 रुपयांपासून सुरू होते. बेसिक प्लॅनच्या माध्यमातून तुम्हाला एकावेळी सिंगल डिव्हाइसवर एचडी व्हिडिओ स्ट्रीम करता येवू शकतो. याची किंमत 199 रुपये आहे. स्टँडर्ड प्लॅनची किंमत 499 रुपये इतकी ठेवण्यात आलीय. तर प्रीमियम प्लॅनसाठी तुम्हाला 649 रुपये मोजावे लागतील.
प्राइम सबस्क्रिप्शन
प्राइम सबस्क्रिप्शन हे व्हिडिओ स्ट्रीमिंगपेक्षा जास्त आहे. या मेंबरशीपमध्ये प्राइम व्हिडिओ, प्रॉडक्टची फास्ट डिलिव्हरी, प्राइम म्यूझिक सबस्क्रिप्शन, त्वरीत विक्री, कॅशबॅक, डील, ऑफर आणि बरंच काही यासह अनेक फायदे यात मिळू शकतात.
अॅमेझॉननं भारतात मोबाइलसाठी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये प्राइम व्हिडिओ प्लॅन जाहीर केले होते. एक बजेट सबस्क्रिप्शन प्लॅन अंतर्गत ही योजना होती. याची किंमत 599 रुपये इतकी आहे. हे सिंगल डिव्हाइस आहे. ठराविक देशांमध्येच ती उपलब्ध आहे. मोबाइल प्लॅनसाठी प्राइम व्हिडिओसह यूझर्स एका वेळी फक्त एका अॅन्ड्रॉइड (Android) किंवा आयओएस (iOS) मोबाइल फोनवर स्टँडर्ड डेफिनेशन (SD) क्वालिटीमध्ये प्राइम व्हिडिओ कंटेंट अॅक्सेस करू शकतील. इतर अॅमेझॉन प्राइम सबस्क्रिप्शन प्लॅनपेक्षा हा प्लॅन वेगळा आहे. कारण मल्टिपल प्रोफाइल यूझर्स किंवा 4K व्हिडिओ क्वालिटीला समर्थन देत नाही. हे नेटफ्लिक्सच्या मोबाइल प्लॅनसारखंच आहे. या माध्यमातून यूझर्सला मोबाइलवर नेटफ्लिक्स कंटेंट स्ट्रीम करू देतं.