भारत हा कृषिप्रधान देश आहे हे आपण सगळेच जाणतो. देशातील बहुतांश नागरिक हे शेती आणि शेतीशी संबंधित उद्योगांवर अवलंबून आहेत. देशाची आर्थिक स्थिती देखील शेती व्यवस्थेवर अवलंबून आहे. शेतीशी संबंधित समस्या देखील अनेक आहेत. आपल्या देशातील शेतकरी पीक पिकवण्यासाठी जेवढी मेहनत घेतो, तेवढीच मेहनत पीक विकण्यासाठी देखील शेतकऱ्यांना करावी लागते.गेल्या काही वर्षांपासून अवकाळी पाऊस, हवामान बदल आदी कारणांमुळे शेतकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो आहे. या सगळ्या समस्यांच्या पार्श्वभूमीवर देशातील आघाडीची ई-कॉमर्स कंपनी Amazon (Amazon India) ने एक नवीन उपक्रम सुरू केला आहे.
कृषी संशोधन संस्था ICAR सोबत करार
देशातील शेतकऱ्यांचे जीवन सुकर व्हावे, त्यांचे उत्पादन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे आणि शेतकऱ्यांना नफा मिळावा या हेतूने ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म ॲमेझॉन इंडियाने एक आगळावेगळा उपक्रम सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमाद्वारे ज्या शेतकऱ्यांनी ॲमेझॉनच्या 'किसान स्टोअर'मध्ये नोंदणी केली आहे अशा शेतकऱ्यांना वैज्ञानिक शेतीबाबत मार्गदर्शन दिले जाणार आहे. याद्वारे शेतकऱ्यांना जास्तीत जात उत्पादन कसे काढता येईल, पिकांची निगा राखण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
Indian Council of Agricultural Research (ICAR) signs an MOU with Amazon Kisan to Empower Farmers
— PIB India (@PIB_India) June 9, 2023
The MoU in farmer’s partnership with Amazon Kisan program will help ensure access to high-quality fresh produce for consumers across India, including through Amazon Fresh
Read here:…
सरकारी पातळीवर खरे तर गावोगावी कृषी केंद्रामार्फत असे प्रशिक्षण दिले जाते, मात्र अपुऱ्या सोयीसुविधा असल्याकारणाने या यंत्रणा दुर्गम भागापर्यंत पोहोचू शकत नाही. ॲमेझॉन इंडियाच्या माध्यमातून आता हे शक्य होणार आहे. याचाच एक भाग म्हणून कृषी संशोधन संस्था ICAR सोबत ॲमेझॉन इंडियाने एक करार केला आहे.
भारतीय कृषि अनुसंधान परिषद (ICAR) आणि Amazon India यांच्यात पुण्यात एक करार केला गेला आहे. ॲमेझॉन इंडियाची ‘ॲमेझॉन फ्रेश सप्लाय चेन’ ही एक सर्विस दिली जाते. याद्वारे शेतकऱ्यांच्या शेतातील माल थेट ग्राहकांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचा ॲमेझॉनचा प्रयत्न आहे. भारतीय कृषि अनुसंधान परिषद (ICAR) ॲमेझॉनसोबत तंत्रज्ञानाचे हस्तांतरण, क्षमता विकास आणि नवीन तंत्रज्ञानासाठी सहकार्य करणार आहे. सार्वजनिक-खाजगी-शेतकरी-भागीदारी (Public-Private-Producer-Partnership) च्या यशस्वीतेसाठी दोन्ही संस्था प्रयत्न करणार आहेत.
किसान स्टोअर 2021 पासून कार्यरत
सप्टेंबर 2021 मध्ये Amazon च्या प्लॅटफॉर्मवर 'किसान स्टोअर' हा स्पेशल सेक्शन सुरु करण्यात आला आहे. या सेक्शनमध्ये शेती संबंधित वस्तू, बियाणे, उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध आहे. तसेच शेतकऱ्यांच्या शेतातील उत्पदाने देखील येथे विक्रीसाठी उपलब्ध आहे. ॲमेझॉन शेतकऱ्यांकडून थेट त्यांच्या शेतात जाऊन पीक खरेदी करते आणि त्यावर प्रक्रिया केल्यानंतर ते थेट ग्राहकांच्या घरी पोहोचवते.