• 02 Oct, 2022 08:40

Amazon Great Freedom Festival: स्मार्ट फोन्सवर स्मार्ट डील्स; अ‍ॅमेझॉनच्या जबरदस्त ऑफर्स!

Amazon Great Freedom Festival: स्मार्ट फोन्सवर स्मार्ट डील्स; अ‍ॅमेझॉनच्या जबरदस्त ऑफर्स!

Amazon Great Freedom Festival: अ‍ॅमेझॉनचा (Amazon) ऑनलाईन शॉपिंग फेस्टिव्हल 6 ऑगस्ट पासून सुरू झाला असून तो 10 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. या सेलमध्ये ग्राहकांना कमी बजेटमध्ये स्मार्टफोन विकत घेता येणार आहे.

Amazon Great Freedom Festival: देशातील सर्वांत मोठ्या आणि लोकांच्या पसंतीस उतरलेल्या ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉनने (Amazon) 6 ऑगस्ट, 2022 पासून अ‍ॅमेझॉन ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल सेल (Amazon Great Freedom Festival Sale) सुरू केला. हा फेस्टिव्हल सेल 10 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार असून या सेलमधून ग्राहकांना आपल्या आवडीचे प्रॉडक्टस स्वस्तात विकत घेण्याची संधी मिळत आहे. जर तुम्हाला नवीन स्मार्टफोन विकत घ्यायचा आहे; पण तुमचे बजेट कमी आहे. तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. या सेलमधून तुम्हाला कमी किमतीत टॉप ब्रॅण्डच्या कंपनीचे स्मार्टफोन (Amazon Mobile Offers 2022) कमी किमतीत मिळू शकतात.


वनप्लस नॉर्ड सीई 2 लाईट 5G (Oneplus Nord CE lite 5G)

वनप्लस कंपनीचा 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज असलेला 5G फोन 19,999 रूपयांऐवजी 18,999 रूपयांना विकला जात आहे. हा फोन विकत घेण्यासाठी तुम्ही एसबीआय क्रेडिट कार्डचा वापर केल्यास तर तुम्हाल बॅंकेकडून आणखी 1 हजार रूपयांची सूट मिळू शकते आणि एक्सचेंज ऑफरमधून या फोनवर 12,750 रूपयांचा डिस्काऊंट मिळू शकतो. म्हणजेच विविध सवलतींचा लाभ घेतल्यास हा फोन तुम्हाला एकूण 7,249 रूपयांनी मिळू शकतो. (Mobile Sale Online Offers)

सॅमसंग गॅलक्सी M33 5G (Samsung Galaxy M33 5G)

सॅमसंगचा हा 24,999 रूपयांचा 5G स्मार्टफोन 18,999 रूपयांना विक्रीसाठी उपलब्ध आहे. 6 जीबी रॅम, 128 जीबी स्टोरेज आणि 6000mAh ची दमदार बॅटरी असलेला हा स्मार्टफोन तुम्हाला एसबीआय क्रेडिट कार्डवर खरेदी केल्यास त्यात 3 हजार रूपयांची सूट मिळेल आणि एक्सचेंज ऑफरमधून 12,750 रूपयांचा डिस्काऊंट मिळू शकतो. म्हणजेच 24,999 रूपयांचा फोन वेगवेगळ्या सवलतींसह 3,249 रूपयांना विकत मिळू शकतो. (Amazon Sale for Mobile Phones)

Amazon Festival Sale 2022

रेडमी नोट 11 प्रो प्लस (RedMi Note 11 Pro+)

5G असलेला 6 जीबी रॅम, 128जीबी स्टोरेज आणि 67W चा टर्बो चार्ज सपोर्टवाला स्मार्टफोन 18,999 रूपयांना अॅमेझॉनवरून विकत घेऊ शकता. याची मूळ किंमत 24,999 रूपये आहे. एसबीआय क्रेडिट कार्ड युझर्सना या फोनच्या खरेदीवर 1 हजार रूपयांचा डिस्काऊंट आणि जुना फोन एक्सचेंज केल्यास त्यावर 14,750 रूपयांची सूट मिळू शकते. म्हणजे सर्व सवलतींसह खरेदीदाराला हा फोन 3,249 रूपयांमध्ये मिळू शकतो. (Amazon Mobile Offers 2022)

आयक्यूओओ Z6 (IQOO Z6 5G)

आयक्यूओओ कंपनीचा या 5G स्मार्टफोनची किंमत 20,990 रूपये असून तो या फेस्टिव्हल सेल ऑफरमध्ये 16,999 रूपयांना मिळू शकतो. याशिवाय बॅंकेची 1 हजार रूपयांची सूट, 1 हजार रूपयांचं कूपन आणि एक्सचेंज ऑफरचे 12,750 यातून खरेदीदाराला हा स्मार्टफोन 2,249 रूपयांमध्ये मिळू शकतो.

ओप्पो ए74 (Oppo A74 5G) 

ओप्पो कंपनीच्या या 5G स्मार्टफोनची किंमत 20,990 रूपये आहे. पण हा फोन अॅमेझॉनच्या सेलमधून 14,990 रूपयांमध्ये मिळू शकतो. एसबीआय कार्डद्वारे हा फोन खरेदी केल्यास यावर 750 रूपयांचा डिस्काऊंट आणि जुन्या फोनच्या एक्सचेंज ऑफरमधून 12,750 रूपयांची सूट मिळू शकते. अशा सर्वप्रकारच्या सवलतींमधून खरेदीदाराला हा स्मार्टफोन फक्त 1,490 रूपयांमध्ये मिळू शकतो. (Amazon Great Freedom Festival Sale 2022) 

Amazon Great Freedom Festival हा फेस्टिव्हल सेल 10 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. (Amazon Sale Date) ग्राहकांना या सेलमधून मोबाईल आणि मोबाईल अक्सिसरीजवर 40 टक्के सूट मिळणार आहे.