Tennis Cricket YouTube: भारतात क्रिकेट जेवढे क्रिकेट खेळले जात नाही. त्याच्या कितीतरी पटीने क्रिकेट पाहणारे चाहते आहेत. यामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळल्या जाणाऱ्या सिझन क्रिकेटचे शौकिन तर आहेतच; पण त्याचबरोबर टेनिस आणि बॉक्स क्रिकेट पाहणाऱ्यांची संख्यादेखील कमी नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटप्रमाणे घरी बसून या मॅचेस पाहण्याची कसर काही यूट्यूबर चॅनेल्सनी पूर्ण करून या इंडस्ट्रीमध्ये आपले वेगळेपण निर्माण केले.
Table of contents [Show]
MMRDA विभागात कोट्यवधी रुपयांच्या स्पर्धा
मुंबईचा विचार केला तर एमएमआरडीए (Mumbai Metropolitan Region Development Authority-MMRDA) विभागामध्ये मे महिन्यातील शनिवार आणि रविवारी एकूण कोट्यवधी रुपयांच्या बक्षिसांच्या क्रिकेट मॅचेस होतात. या स्पर्धांचे तरुणांमध्ये मोठे आकर्षण आहे. हेच आकर्षण हेरून काही तरुणांनी यू्ट्यूबच्या माध्यमातून टेनिस क्रिकेट आता घराघरांत पोहचवून आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
यूट्यूबमुळे अनेकांना आवडीच्या क्षेत्रात काम करण्याची संधी
यूट्यूबमुळे अनेकांना घरातील मुलांना मोठ्यांचा आरडाओरडा खावा लागतो. तर काही घरांमध्ये यूट्यूबमुळे मुलांचे कौतुक होत आहे. एकूणच यूट्यूब चॅनेल्समुळे अनेकांच्या प्रतिभेला वाव तर मिळला आहे. पण त्याचबरोबर त्यातून त्यांना चांगले पैसेदेखील मिळत आहेत. आपल्या आवडीचे काम पैसे मिळवणे अनेकांच्या नशिबी नसते. त्यामुळे पूर्वी बरेचजण आपली पैशांची गरज पूर्ण करण्यासाठी आवड नसलेल्या ठिकाणी काम करत होते. पण आता ती परिस्थिती राहिलेली नाही. प्रत्येकाला आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळत आहे. त्याला यूट्यूबची मोलाची साथ मिळत आहे.
आज आपण अशाच काही यूट्यूब चॅनेलबद्दल जाणून घेणार आहोत. ज्यांनी आपला खेळ, छंद जोपासला आणि त्यातूनच चांगली कमाईसुद्धा सुरू केली. टेनिस क्रिकेटमध्ये सध्या काही मोजके यूट्यूबर्स उतरले आहेत; पण त्यांना टेनिस क्रिकेटप्रमेंकडून अफलातून प्रतिसाद मिळत आहे.
TennisCricket.in
टेनिस क्रिकेट डॉट इन ही भारतातील सर्वांत पहिली टेनिस बॉल क्रिकेटची इत्यंभूत माहिती देणार वेबसाईट आहे. टेनिस क्रिकेटची लोकप्रियता पाहून या वेबसाईटचे फाऊंडर संतोष नानेकर यांनी TennisCricket.in या नावाचा यूट्यूब चॅनेल सुरू केला आहे. नानेकर यांच्या या चॅनेलचे 1.71 मिलिअन सब्स्क्रायबर्स आहेत. सध्या टेनिस क्रिकेटमधील मोठमोठ्या स्पर्धांचे लाईव्ह प्रक्षेपण या चॅनेलवर पाहिले जाते.
TennisCricket.in हा यूट्यूब चॅनेल एप्रिल, 2014 पासून सुरू आहे. या चॅनेलला साधारण प्रत्येक महिन्याला 1.1 k ते 17k डॉलरचे इन्कम मिळते. तसेच या चॅनेलची खासियत म्हणजे इथे मॅच पाहताना प्रेक्षकांना एखादी इंटरनॅशनल मॅच पाहत असल्याचा अनुभव मिळतो. प्रत्येक बॉलचे अपडेट, स्कोअर कार्ड, भन्नाट अशी कॉमेंट्री, कॅचचा किंवा बोल्ड झालेल्या क्षणाचा रिप्लेसुद्धा प्रेक्षकांना काही क्षणात यावर पाहायला मिळतो. यूट्यूबच्या माध्यमातून नानेकर यांनी पुन्हा एकदा टेनिस क्रिकेटला एक वेगळे ग्लॅमर मिळवून देण्यात नक्कीच हातभार लावला आहे.
7070 Sports
7070 स्पोर्ट्स हा मुंबईतील टेनिस क्रिकेट खेळणाऱ्यांमध्ये प्रसिद्ध असलेला यूट्यूब चॅनेल आहे. बॉक्स क्रिकेटपासून अंडरआर्म क्रिकेटमधील बहुतांश क्रिकेटचे सामने या चॅनेलवर पाहायला मिळतात. या चॅनेलचे आतापर्यंत 487 हजार सब्स्क्रायबर्स आहेत. या चॅनेलच्या माध्यामातून अनेकजण मिस झालेल्या जुन्या मॅचसुद्धा पाहतात. एवढी याची तरुणांमध्ये क्रेझ आहे. या चॅनेलची सुरूवात जानेवारी, 2017 मध्ये झाली होती. यूट्यूबकडून या चॅनेलला महिन्याभरात साधारण 1.1 k ते 17k डॉलरचे इन्कम मिळते.
Bhiwandi Cricket TV
भिवंडी क्रिकेट टीव्ही या नावाच्या यूट्यूब चॅनेलचे 153 हजार सब्स्क्रायबर्स आहेत. या चॅनेलवर टेनिस क्रिकेट टुर्नामेंटचे सर्व अपडेट पाहायला मिळतात. मुंबईतील नामांकित सुप्रिमो चषक बरोबरच इंडिया कप, टेनिस क्रिकेटमधील अॅवॉर्ड प्रोग्रॅम अशी सर्व माहिती या चॅनेलमधून प्रक्षेपित केली जाते. हा चॅनेल ऑक्टोबर, 2019 पासून टेनिस क्रिकेटची माहिती आणि मॅच दाखवत असून यूट्यूबकडून या चॅनेलला 1.2k ते 18.7k डॉलरचे उत्पन्न मिळते.
Criclife Sports
क्रिकलाईफ स्पोर्ट्स हा आणखी एक यूट्यूब चॅनेल. जो तरुणांमध्ये लोकप्रिय आहे; विशेषत: ग्रामीण भागातील तरुणांमध्ये याची क्रेझ आहे. या चॅनेल्सचे एकूण 75.3 हजार सब्स्क्रायबर्स आहेत. या चॅनेलने नुकतेच पुण्यातील मुळशी प्रीमिअर लीग 2023 आणि कोथरूड प्रीमिअर लीग 2023 या टेनिस क्रिकेट सामन्यांच्या लाईव्ह मॅचेस प्रेक्षकांना दाखवल्या. Criclife Sports हा यूट्यूब चॅनेल ऑक्टोबर, 2016 पासून सुरू आहे. या चॅनेलला साधारण प्रत्येक महिन्याला 905 डॉलरचे इन्कम मिळते.
Gujarat Tennis Cricket
गुजरात टेनिस क्रिकेट यूट्यूब चॅनेल हा तीन तरुणांद्वारे चालवला जाणारा यूट्यूब चॅनेल आहे. या चॅनेलचे 51.8 हजार सब्स्क्रायबर्स आहेत. ऑक्टोबर, 2017 पासून हा यूट्यूब चॅनेल सुरू असून यावर 1.2 हजार व्हिडिओज आणि वेगवेगळ्या टुर्नामेंट कव्हर केल्या आहेत. या चॅनेलला यूट्यूबकडून प्रत्येक महिन्याला 67 ते 1.1k डॉलरचे उत्पन्न मिळते. या चॅनेलवरून ओसवाल प्रीमिअर लीग 2023, राजकोट सिटी पोलीस क्रिकेट टुर्नामेंट 2023 आणि टुंडा स्पोर्ट्स क्लब क्रिकेटचा महासंग्राम 2023 अशा मानाच्या क्रिकेट स्पर्धांचे लाईव्ह प्रक्षेपण दाखवले जाते.
यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून टेनिस क्रिकेटच्या लाईव्ह मॅच प्रक्षेपित होत असल्यामळे ज्या घरातील मुले टेनिस क्रिकेट खेळतात. त्यांच्या कुटुंबियांनाही आता आपला मुलगा नेमका कोठे खेळतो, कसा खेळतो, त्याच्या खेळाला लोक दाद कशी देतात. हे प्रत्यक्ष ग्राऊंडवर न जाता घरात बसून पाहता येत आहे. त्यामुळे सचिन, धोनी, विराटबरोबरच आपल्या मुलालाही क्रिकेट खेळताना स्क्रिनवर पाहण्याची संधी मिळत आहे.