Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

What is Crop Insurance: पीक विमा योजना म्हणजे काय? त्याचे प्रकार, पात्रता आणि क्लेम करण्याची प्रक्रिया समजून घ्या!

What is Crop Insurance

What is Crop Insurance: पीक विमा योजनेमध्ये बियाणांची पेरणी, रोपांची लागवड, तसेच दुष्काळ, पूर किंवा भूस्खलनामुळे उगवून आलेल्या पिकांचे नुकसान झाल्यास त्याची भरपाई मिळण्याची तरतूद असते. पीक विमा पॉलिसी ही कोणत्याही इन्शुरन्स कंपनीकडून विकत घेता येऊ शकतो.

नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा पूर, वादळामुळे झालेल्या शेतीचे आर्थिक नुकसान भरून काढण्याबरोबरच शेतकऱ्यांना पुढील पिकासाठी आर्थिक पाठबळ मिळावे. यासाठी पीक विमा योजना महत्त्वाचा ठरतो. यामध्ये दुष्काळ किंवा अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान होते असेल त्याची विम्यामध्ये असलेल्या तरतुदीनुसार नुकसान भरपाई मिळण्याची तरतूद आहे. या नुकसान भरपाईमुळे शेतकऱ्यांना एक आर्थिक पाठबळ मिळते. जेणेकरून ते पुढील पिकाचे उत्पादन घेण्यासाठी आर्थिक आणि मानसिक दृष्ट्या तयार राहू शकतात.

पीक विमा योजनेमध्ये बियाणांची पेरणी, रोपांची लागवड, तसेच दुष्काळ, पूर किंवा भूस्खलनामुळे उगवून आलेल्या पिकांचे नुकसान झाल्यास त्याची भरपाई मिळण्याची तरतूद यामध्ये असते. पीक विमा पॉलिसी ही कोणत्याही इन्शुरन्स कंपनीकडून जसे की, एसबीआय जनरल इन्शुरन्स कंपनी, एचडीएफसी जनरल इन्शुरन्स या कंपन्यांकडून विकत घेता येऊ शकतो. तसेच सरकारद्वारेही पीक विमा योजनेचे नियोजन केले जाते.

पीक विम्याचे प्रकार

मल्टिपल पेरिल पीक विमा 

नैसर्गिक आपत्तीमुळे जसे की, वणवा, पूर, अतिवृष्टी, दुष्काळ यामुळे शेतीचे नुकसान झाल्यास त्यातून आर्थिक भरपाई मिळण्याची सुविधा पेरिल पीक विमा (Multiple Peril Crop Insurance) योजनेमध्ये आहे.

पीक उत्पादन विमा

वादळ, गारपीठ तसेच टोळधाडीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास किंवा पिकाची उत्पादन क्षमता कमी झाल्यास त्यातून आर्थिक भरपाई मिळण्याची तरतूद या विमा प्रकारात आहे.

पीक महसूल विमा

या प्रकारात पिकाचे फक्त उत्पादन ग्राह्य धरले जात नाही. तर त्याचबरोबर शेतीतून अपेक्षित महसूल मिळाले नाही तरी त्याची भरपाई मिळण्याची तरतूद या विमा प्रकारात आहे.

पीक विमा योजनेत कोणत्या गोष्टींचा समावेश होतो?

स्थानिक वातावरणीय बदल

यामध्ये स्थानिक वातावरणातील बदल जसे की, गारपीठ, भूस्खलनामुळे विशेष क्षेत्रात असलेल्या शेतीचे नुकसान झाल्यास त्याची भरपाई मिळते.

पिकांची पेरणी/लागवड

पिकांची पेरणी करताना किंवा लागवड करताना वातावरणीय बदलामुळे पाऊस जास्त झाला किंवा दुष्काळासारखी परिस्थिती उद्भवल्यास त्याची भरपाई मिळू शकते.

लागवड झालेल्या पिकाचे नुकसान झाल्यास

दुष्काळ, पूर, गारपीठ किंवा चक्रीवादळामुळे पूर्णपणे लागवड झालेल्या पिकाचे नुकसान झाल्यास त्याची भरपाई विम्यातून मिळू शकते.

लागवडीनंतर झालेले नुकसान

पिकांची पेरणी केल्यानंतर साधारण दोन आठवड्यात त्या पिकांचे नुकसान झाल्यास त्याची भरपाई मिळण्याची तरतूद आहे.

पीक विम्यासाठी पात्रता काय?

ज्याच्याकडे स्वत:ची शेतजमीन आहे. किंवा जो शेतीतून नियमितपणे उत्पादन घेतो असा शेतकरी किंवा व्यक्ती पीक विम्यासाठी पात्र आहे. पण ज्या शेतकऱ्यावर अगोदरच शेतीवर कर्ज आहे. त्या शेतकऱ्याला पीक विमा मिळण्यात अडचण येते.

पीक विम्याचा दावा कसा करतात?

पीक विम्याचा दाव दाखल करण्यासाठी साधारण घटनेमध्ये सर्वप्रथम शेतकऱ्यांना इन्शुरन्स कंपनीकडे अर्ज दाखल करावा लागतो. त्या अर्जाची कंपनी दखल घेऊन त्यानुसार इन्शुरन्स कंपनीतर्फे सर्वेक्षण करून नुकसानीची मोजणी केली जाते. ही पाहणी/मोजणी कंपनीतर्फे किंवा एखाद्या संस्थेतर्फे केली जाते. दुसऱ्या एका पद्धतीत मोठ्या नैसर्गिक घटनेमुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले असेल तर तिथल्या राज्य सरकारतर्फे त्यानुसार संबंधित नुकसानीचा अहवाल सादर करून इन्शुरन्स कंपन्यांना आर्थिक मदतीचे आवाहन केले जाते.

विम्याचा दावा करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात?

  • शेतकऱ्याचा दाव्याचा अर्ज
  • जमिनीच्या नोंदणीची आणि मालकीची अधिकृत कागदपत्रे 
  • शेतकऱ्याचे आधारकार्ड
  • फोटो आयकार्ड (पॅनकार्ड, आधारकार्ड, मतदार ओळखपत्र)
  • बॅंक खात्याचा तपशील

दावा निकाली निघण्यासाठी किती कालावधी लागू शकतो?

सर्वसाधारण पीक विम्याच्या घटनांमध्ये 30 ते 45 दिवसानंतर इन्शुरन्स कंपनीतर्फे दावे निकाली काढले जातात. यामध्ये कंपनी कागदपत्रांची पडताळणी करून, झालेल्या नुकसानीची पाहणी करून अहवाल सादर करतात. त्या अहवालावर कंपनीचे अधिकारी निर्णय घेऊन दावे निकाली काढतात.