Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Dematerialization: डिमटेरिअलायझेशन म्हणजे काय?

Dematerialization of Shares

Dematerialization of Shares: डिमटेरियलायझेशन प्रक्रियेद्वारे कंपनीची भौतिक शेअर प्रमाणपत्रे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात रूपांतरित केली जातात आणि त्यानंतर हे डिमटेरिअलाईजड् शेअर्स डिपॉझिटरीसह उघडलेल्या ऑनलाईन डिमॅट खात्यात (Online Demat Account) ठेवले जातात.

भारतात डिमॅट खाती आणि इलेक्ट्रॉनिक शेअर ट्रेडिंग सुरू झाल्यापासून, प्रत्यक्ष शेअर सर्टिफिकेट्सचा वापर सातत्याने कमी होत आहे. किंबहुना, फिजिकल शेअर सर्टिफिकेटचा वापर करण्यापेक्षा कंपन्यांनी केवळ डिमटेरिअलाइज्ड फॉर्ममध्ये शेअर्स द्यावेत, असे सिक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने नमूद केले आहे. तर डिमटेरिअलायझेशन म्हणजे काय? त्याची प्रक्रिया कशी पूर्ण करतात?  शेअर डिमटेरियलायझेशनबद्दल माहिती जाणून घेऊया.

ज्या प्रक्रियेद्वारे कंपनीची भौतिक शेअर प्रमाणपत्रे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात रूपांतरित केली जातात, त्यांना शेअर्सचे डीमटेरियलायझेशन असे म्हणतात. हे डिमटेरिअलाईजड् शेअर्स नंतर डिपॉझिटरीसह उघडलेल्या ऑनलाईन डिमॅट खात्यात (Online Demat Account) ठेवले जातात. स्टॉक ट्रेडिंगच्या सध्याच्या संदर्भात, तुमचे शेअर्स दुसऱ्या खात्यात नेण्यास किंवा हस्तांतरित करण्यास सक्षम होण्यासाठी शेअर डिमटेरिअलायझेशन करणे अनिवार्य आहे.

शेअर्स डिमटेरिअलायझेशनचे  फायदे (Benefits of Dematerialization of Shares)

सुरक्षेत वाढ (Enhanced Safety)

डिमटेरिअलायझेशनमध्ये भौतिक शेअर्सचे इलेक्ट्रॉनिक शेअर्समध्ये रूपांतर झाल्यामुळे तुमच्या शेअर सर्टिफिकेटचे नुकसान, विकृतीकरण, तोटा किंवा चोरीची काळजी करण्याची गरज नाही. तुम्हाला तुमचे सर्व शेअर्स एकाच डिमॅट खात्यात (Demat Account) सुरक्षितपणे ठेवता येतील. हे खाते जगभरातून कुठूनही चालवता येऊ शकते. भौतिक शेअर प्रमाणपत्रे  वापरात असतांना फसवणूकीची आणि खोट्या कागदपत्रांची अनेक उदाहरणे समोर येत होती. परंतु, आता डीमटेरियल शेअर्सची सुविधा उपलब्ध असल्याने यापैकी कोणतीही घटना घडण्याची शक्यता कमी होऊ शकते.

झटपट हस्तांतरणाची सुविधा (Facility of Instant Transfer)

प्रत्यक्ष शेअर सर्टिफिकेटसह, शेअर्स एका व्यक्तीकडून दुसर्‍या व्यक्तीकडे हस्तांतरित करण्यासाठी सामान्यतः काही दिवस लागतात. पण शेअर डिमटेरिअलायझेशनमुळे, शेअर ट्रान्सफर करणे सोपे झाले आहे. तसेच, कमी कालावधीमध्ये शेअर ट्रान्सफर करणे शक्य झाले आहे.

शेअर्सचे डिमटेरिअलायझेशन करण्याची प्रक्रिया (Process of Dematerialization)

  1. शेअर डिमटेरिअलायझेशन प्रक्रिया समजण्यास सोपी आहे. तसेच, ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी फक्त काही दिवस लागतात. शेअर्सचे अभौतिकीकरण करण्याची प्रक्रिया पुढीलप्रमाणे:
  2. तुम्हाला डिपॉझिटरी पार्टिसिपंट (DP) द्वारे डिपॉझिटरीसह डिमॅट खाते उघडणे आवश्यक आहे. साधारणपणे, ज्या स्टॉक ब्रोकरकडे तुमचे ट्रेडिंग खाते आहे तो देखील डीपी म्हणून कार्य करू शकतो.
  3. डिमॅट खाते उघडल्यानंतर, तुम्हाला तुमच्या मालकीच्या भौतिक शेअर सर्टिफिकेटसह, तुमच्या डीपीकडे रीतसर भरलेला डीमटेरियलायझेशन रिक्वेस्ट फॉर्म (DRF) सबमिट करावा लागतो.
  4. जर तुमच्याकडे अनेक कंपन्यांचे शेअर्स असतील तर, तुम्हाला प्रत्येक कंपनीसाठी संबंधित शेअर सर्टिफिकेटसह रीतसर भरलेला DRF सबमिट करावा लागेल.
  5. DRF मिळाल्यावर, तुमचा DP सर्व काही व्यवस्थित असण्याबाबत खात्री करण्यासाठी फॉर्म आणि सिक्युरिटीज या दोन्ही गोष्टींची पडताळणी करेल.
  6. कागदपत्रांची छाननी झाल्यानंतर DP तुम्हाला एक डिमटेरिअलायझेशन रिक्वेस्ट नंबर (DRN) पोचपावती म्हणून देईल.
  7. त्यानंतर, तुमची विनंती कंपनीच्या रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट (आरटीए)कडे डीपीद्वारे पाठवली जाईल.
  8. कंपनीच्या RTA ने तुमची डीमटेरियलायझेशन विनंती स्वीकारली की, फिजिकल शेअर सर्टिफिकेट इलेक्ट्रॉनिक मोडमध्ये रूपांतरित केले जातात.
  9. त्यानंतर, डिमॅट केलेले शेअर्स तुमच्या डिमॅट खात्यात जमा केले जातात, हे शेअर्स तुम्ही नंतर विकू शकता किंवा इतर खात्यांमध्ये हस्तांतरित करू शकता.

अशाप्रकारे या स्पष्टीकरणावरून असे लक्षात येते की, शेअर डिमटेरिअलायझेशन ही पद्धत गुंतागुंतीची नाही आणि त्यासाठी जास्त वेळ देण्याची आवश्यकता नाही. शेअर्सच्या अभौतिकीकरणामुळे शेअर ट्रेडिंगची अवघड असणारी संपूर्ण प्रक्रिया सोपी झाली आहे. या प्रक्रियेने इलेक्ट्रॉनिक शेअर ट्रेडिंगच्या एका नवीन युगाची सुरुवात केली आहे. शेअर डिमटेरिअलायझेशनने शेअर ट्रेडिंगच्या वाढीसाठी आणि लोकांमध्ये लोकप्रियता वाढवण्यात मोठे योगदान दिले आहे.