Tradition Behind Buying Gold : अक्षय्य तृतीया ही वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी साजरी केल्या जाते. या दिवशी आपण जे काही खरेदी करतो, ते दिवसें दिवस वाढतच जाते. त्याचे यश अक्षय्य म्हणजे कधीही न संपणारे असते, अशी मान्यता हिंदू संस्कृती मध्ये आहे. तसेच हिंदू संस्कृतीमध्ये राजा-महाराज्यांच्या काळापासूनच सोने-चांदी, मोल्यवान रत्न या गोष्टींना प्रचंड महत्व आहे. कोणत्याही गोष्टींचा आनंद साजरा करतांना, कुणाला मोल्यवान भेट देतांना आणि एखाद्याला विजयाचे बक्षिस देतांना देखील सोने देणे हे श्रीमंतीचे प्रतीक मानल्या जायचे. तेव्हापासून आपल्या जवळ सोने असणे हे श्रीमंतपणाचे आणि प्रचंड वैभवाचे प्रतिक मानल्या जाऊ लागले. आजही लग्नकार्यात वधू मुलीला अधिकाधिक सोने देण्याचा प्रयत्न केल्या जातो.
सोन्यात गुंतवणूक करण्याची कारणे
आर्थिक दृष्टीकोनातून सोने हे सुरक्षित आणि स्मार्ट गूंतवणूक करण्याचे प्रतिक मानले जाते. तुम्ही कोणत्याही वेळी ही गुंतवणूक करु शकता. सोने हे महागाई, म्युच्युअल फंड आणि स्टॉक यासारख्या उच्च जोखीम गुंतवणूकीच्या साधनांचे पर्याय म्हणून सोन्यात गुंतवणूक सुरक्षित ठरते.
डिजीटल सोने खरेदी
या अक्षय्य तृतीयेला डिजीटल सोने खरेदी करणे हा एक चांगला पर्याय असु शकतो. डिजीटल सोने हा एक भौतिक सोन्याचा पर्याय आहे. हा व्यवहार विनिमय दरातील फेरफार आणि फरकांपासून मुक्त असु शकतो. आणि गुंतवणूकदाराला प्रत्यक्ष सोन्याला स्पर्श न करता जगभरात सहजपणे व्यापार करु शकतो. डिजिटल सोनं ही एक अशी पद्धत आहे; ज्याद्वारे तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे डिजिटली कधीही आणि कुठेही कमी प्रमाणातसुद्धा सोन्यामध्ये गुंतवणूक करू शकता. डिजिटल सोन्यात गुंतवणूक करण्याचे विविध प्रकार आहे. जसे की, सॉव्हरिन गोल्ड बॉण्ड (Sovereign Gold Bonds-SGB), गोल्ड एक्सचेंज-ट्रेडेड फंड (Gold Exchange Traded Fund- Gold ETF), एमसीएक्स गोल्ड कॉन्ट्रॅक्ट्स (MCX Gold Contracts), डिजिटल गोल्ड संस्था (Digital Gold Organizations)