Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Aishwarya Rai Bachchan: शेतकरी ऐश्वर्या राय हिला कर न भरल्याप्रकरणी नोटीस

Aishwarya

सिन्नर तालुक्याक्सचे तहसीलदार एकनाथ सांगळे यांनी ऐश्वर्या रायला नोटीस पाठवली आहे. तसेच पुढील दहा दिवसांच्या आत कर न भरल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारादेखील देण्यात आला आहे.

बॉलीवूड अभिनेत्री आणि बच्चन घराण्याची सून ऐश्वर्या राय-बच्चन (Aishwarya Rai Bachchan) हिला शेतीचा कर न भरल्या प्रकरणात नोटीस बजावण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात एका गावठाणात ऐश्वर्या राय हिच्या मालकीची एक हेक्टर शेती जमीन आहे. या शेती जमिनीचा 21 हजार 969 रुपयांचा कर वेळेत न भरल्यावरकरणी ऐश्वर्या हिला सिन्नर तहसीलदारांनी (Revenue Department ) ही नोटीस बजावली आहे.

सिन्नर तालुक्याक्सचे तहसीलदार एकनाथ सांगळे यांनी ऐश्वर्या रायला नोटीस पाठवली आहे. तसेच पुढील दहा दिवसांच्या आत कर न भरल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारादेखील देण्यात आला आहे.

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील ठाणगावजवळ आडवाडी येथे ऐश्वर्या राय-बच्चन यांची जमीन आहे. या जमिनीचा गेल्या वर्षीचा कर भरलेला नाही. येत्या दहा दिवसांत हा कर भरावा लागणार आहे अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.