Air India Republic Day sale: एअर इंडियाने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून विमान प्रवासाची अशी ऑफर आणली आहे, ज्यामुळे तुम्ही हवेत जाल. हवेत जाल म्हणजे तुमचं विमान प्रवासाचं स्वप्न पूर्ण होईल, तेही अगदी स्वस्तात. त्यामुळे जर तुम्ही भारतामध्ये कुठं ट्रिपचं किंवा प्रवासाचं प्लॅनिंग करत असाल तर लवकर एअर इंडियाच्या साइटवर जाऊन तिकीट बुक करा. कारणी ही ऑफर आजच संपणार आहे. भारतातील 49 पेक्षा जास्त डेस्टिनेशनला जाण्यासाठी तुम्ही कमी किंमतीत तिकीट बुक करू शकता. 21 जानेवारी ते 23 जानेवारी या कालावधीत तुम्ही सवलतीच्या दरात तिकीट बुक करू शकता.
एअर इंडियाने या ऑफरचे नाव 'फ्लायएआय सेल' ठेवले आहे. या सेलमध्ये तुम्ही फक्त 1 हजार 705 रुपयांमध्ये विमानाचे तिकीट खरेदी करू शकता. हा सेल 21 जानेवारीला सुरू झाला असून 23 जानेवारी म्हणजे आज संपत आहे. एअर इंडियाचा बुकींग प्लॅटफॉर्म, अॅप्स, बुकिंग साईट्स आणि अधिकृत एजंटकडे तिकीट बुक करुन तुम्ही ऑफरचा लाभ घेऊ शकता.
1 फेब्रुवारी ते 30 सप्टेंबर 2023 दरम्यान बुक केलेल्या तिकीटांवर ही ऑफर लागू असणार आहे. या काळात बुक केलेली तिकिट तुम्हाला स्वस्तात मिळतील. ही सवलतीची तिकीटे इकॉनॉमी क्लासमध्ये मिळतील. विमानाची तिकिटे 1,705 रुपयांपासून पुढे आहेत.
दिमापूर ते गुवाहाटी - रु. 1,783
गोवा ते मुंबई - रु 2,830
अहमदाबाद ते मुंबई - रु. 1,806
दिल्ली ते श्रीनगर - रु. 3,730
बंगळुरू ते मुंबई - रु. 2,319
दिल्ली ते मुंबई - रु 5,075
चेन्नई ते दिल्ली - रु 5,895