Pamela Anderson News:बाॅलिवुड असो किंवा हाॅलिवुड या क्षेत्रातील लग्नसोहळे जेवढी हीट होतात, तेवढीच यांची घटस्फोटदेखील सुपरहीट ठरतात. हाॅलिवुड स्टार पामेला अॅंडरसन (Pamela Anderson) व हाॅलिवुड निर्माता जाॅन पीटर्स (Jon Peters) यांचा संसार फक्त 12 दिवस चालला, तरी या निर्मात्याने पत्नीच्या नावाववर 81 कोटी रूपयांची संपत्ती केली. याविषयी सविस्तर जाणून घेवुयात.
निर्माता जाॅन पीटर्सचे इच्छापत्र (Producer John Peters Will)
हाॅलिवुड स्टार पामेला अॅंडरसन ही पुन्हा एकदा सोशल मिडीयावर वेगाने चर्चेत आली आहे. याचे कारण म्हणजे तिचे पूर्वपती निर्माता जाॅन पीटर्सने आपल्या इच्छापत्राचा खुलासा केला आहे. त्याने त्यात म्हटले आहे की, मी पामेला अॅंडरसनवर खरे मनापासून प्रेम केले आहे. म्हणून मी तिच्या नावावर एक मोठी रक्कम ठेवत आहे. तिला याची गरज असो किंवा नसो. पण मी हिच्या नावावर 81 कोटी 51 लाख रूपये ठेवत आहे. याबाबत तिला काहीच माहित नसल्याचेदेखील त्याने यावेळी सांगितले आहे.
कधी झाले होते यांचे लग्न (When was their Marriage)
हाॅलिवुड स्टार पामेला अॅंडरसन व निर्माता जाॅन पीटर्सचे लग्न 20 जानेवारी 2020 रोजी झाले होते. यापूर्वी त्यांनी 1980 मध्ये पहिल्यांदा एकमेकांना डेट केले होते. या लग्नाच्या प्रमाणपत्रासाठी कायदेशीर कागदपत्रे जमा करण्यात आली नसल्याचे, पामेलाव्दारे सांगण्यात येत आहे. तसेच तिने 1 फेब्रुवारी 2020 रोजी ही पेपरवर्क थांबविण्यात आले असल्याची घोषणा केली. तसेच तिने जाॅनशी कायदेशीर लग्न केले नसल्याचेदेखील त्यावेळी सोशलमिडीयाच्या माध्यमातून सांगितले होते. हे दोघे फक्त पाच दिवस सोबत होते, त्यानंतर या दोघांचा ब्रेकअप झाला असल्याचे खुलासा काही रिपोर्टव्दारे करण्यात आला आहे. पामेलाचे जाॅनशी केले लग्न हे पाचवे होते.
पामेला बिग बाॅसमध्ये होती (Pamela was in Bigg Boss)
हाॅलिवुडची स्टार अभिनेत्री पामेला अॅंडरसन ही बिग बाॅस 4 मध्ये झळकली होती. ही या रियालिटी शो मध्ये फक्त तीनच दिवसांसाठी होती. मात्र तिने यासाठी अधिक रक्कम घेतली होती. तर जाॅन पीटर्स यांनी ‘बॅटमॅन’ (Batman) या चित्रपटाची निर्मिती केली आहे.