समजा तुम्ही इंस्टामार्टवरून काही वस्तू मागवल्या आहेत. ऑर्डर तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते आणि जेव्हा तुम्ही पॅकेट उघडता तेव्हा तुम्हाला त्यात 2000 रुपयांची नोट दिसते. साहजिकच तुम्ही सुरुवातीला आनंदी व्हाल. सामनासोबत दिलेली 2000 रुपयांची नोट घ्यायला कोणाला आवडणार नाही? पण या नोटेची बारकाईने तपासणी केल्यास ती खोटी असल्याचे तुमच्या लक्षात येईल. तुमच्या चेहऱ्यावर आनंदाऐवजी चिंतेचे भाव दिसू लागणार हे उघड आहे कारण बनावट नोटा ठेवणे किंवा बाजारात चालवणे हा कायदेशीर गुन्हा आहे.इंस्टामार्ट वापरणाऱ्या देशातील लाखो लोकांच्या बाबतीत असेच घडले आहे. किराणा डिलिव्हरी वेबसाइट स्विगी इंस्टामार्टने आपल्या ग्राहकांना दोन हजारांची खोटी नोट पाठवली आहे. (swiggy instamart Fake 2000 Rs Note).
Got my #FarziOnPrime note today. Fun partnership between @Swiggy Instamart and the @amazonIN Prime team.
— Dale Vaz (@dale_vaz) February 21, 2023
Now I just need to find a CT-600 machine to check how good this #Farzi note is. ? pic.twitter.com/nlx6cvFO0W
खरे तर, स्विगीने हे काम एका वेब सीरिजच्या प्रमोशनसाठी (Web Series Promotion) केले आहे. आत्तापर्यंत तुम्हाला समजले असेलच की आम्ही कोणत्या वेब सीरिजबद्दल बोलत आहोत. तुम्हाला याबद्दल माहिती नसेल तर जाणून घ्या या लेखात याबद्दल सविस्तर माहिती. Amazon Prime च्या 'Farzi Web Series' या वेबसिरीजबद्दल आम्ही इथे बोलत आहोत. स्विगी इंस्टामार्टने Farzi च्या प्रमोशनसाठी शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि विजय सेतुपती (Vijay Setupati) यांचे चेहरे छापलेल्या बनावट नोटा पाठवल्या आहेत. शाहिद कपूर फर्जीमध्ये खलनायकाच्या भूमिकेत आहे आणि दक्षिण भारतीय चित्रपटांचा सुपरस्टार विजय सेतुपती मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
Swiggy ने बनावट नोटा का पाठवल्या?
खरे तर, वेब सिरीजची कथा बनावट नोटांवर आधारित आहे. यामध्ये शाहिद कपूरची व्यक्तिरेखा बनावट नोटा बनवते आणि विजय सेतुपती, जो अधिकारी आहे, त्याला रोखण्याचा प्रयत्न करतो. बनावट नोटांची ही थीम लक्षात घेऊन स्विगी इंस्टामार्टने लोकांना बनावट नोटा पाठवल्या आहेत. प्राइम व्हिडीओ (Amazon Prime Video) आणि स्विगी यांच्या सहकार्याने चालवलेले हे मार्केटिंग धोरण (Marketing Strategy) आहे. फॅमिली मॅन (Family Man) आणि स्त्री (Stree) या चित्रपटाचे निर्माते राज (Raj Nidimoru) आणि डीके (Krishna D.K ) यांनी ही वेबमालिका तयार केली आहे. या मालिकेत शाहिद आणि विजय व्यतिरिक्त केके मेनन (Kay Kay Menon), राशी खन्ना (Raashii Jyanna), भुवन अरोरा (Bhuvan Arora) यांच्याही भूमिका आहेत. या मालिकेत आपल्याला ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकरही (Amol Palekar) पाहायला मिळणार आहेत.
कंपनीचे स्टेटमेंट
स्विगीचे मार्केटिंग हेड आशिष लिंगमनेनी यांनी म्हटले आहे की प्राइम व्हिडिओसोबत काम करणे आमच्यासाठी रोमांचकारी आहे. ते म्हणाले की, “आम्ही स्विगी इंस्टामार्ट ऑर्डरसह बनावट चलनी नोटा ग्राहकांना पाठवल्या आहेत जेणेकरून अधिकाधिक लोकांना या शोबद्दल माहिती मिळावी. याने हजारो Instamart वापरकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले आणि आम्हाला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.”