Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Double Decker seats in Flight: बस अन् ट्रेननंतर आता विमानातही डबल डेकर! बदलणार प्रवासाचा अनुभव

Double Decker seats in Flight: बस अन् ट्रेननंतर आता विमानातही डबल डेकर! बदलणार प्रवासाचा अनुभव

Image Source : www.wionews.com

Double Decker seats in Flight : प्रवासी बस तसंच ट्रेनमध्ये डबल डेकर सीट आपण पाहिल्या आहेत. मात्र विमानात अशी सुविधा कधीही पाहण्यात आली नव्हती. आता ती सुविधाही विमानात दिली जाणार आहे. नुकतेच काही फोटो व्हायरल झाले आहेत. काय घडतंय यासंदर्भात नेमकं? पाहूया...

विमान प्रवासाचा (Flight journey) अनुभव आता पूर्णपणे बदलला जाणार आहे. कारण फ्लाइटमध्येदेखील डबल-डेकर सीट्स (Double Decker seats) आगामी काळात पाहायला मिळणार आहेत. एका 23 वर्षीय विद्यार्थ्यानं अशी ही संकल्पना आणलीय. ही संकल्पना विमान प्रवासाच्या बाबतीत गेम चेंजर ठरू शकते. दोन वर्षांपूर्वी म्हणजेच 2021मध्ये अलेजांद्रो नुनेझ व्हिसेंट या विद्यार्थ्यानं आपल्या कॉलेज प्रोजेक्टच्या अंतर्गत विमानातल्या डबल-डेकर सीटची नवीच संकल्पना मांडली. या संकल्पनेवर त्यानं सतत दोन वर्षे कामदेखील केलं. जर्मनीतल्या हॅम्बुर्गमधल्या एअरक्राफ्ट इंटिरियर्स एक्सपोमध्ये (AIX) त्यानं याचं सादरीकरण केलं.

इकॉनॉमी क्लासला रिप्लेसमेंट

आपल्या प्रोजेक्टविषयी डिझायनर अलेजांद्रो यानं सांगितलं, की अशाप्रकारच्या सीट प्रवाशांसाठी अतिशय आरामदायक असणार आहेत. हवाई सफरीच्या या जगात नवीन बदल यामुळे घडवून आणता येतील. प्रवाशांना एक वेगळा अनुभव यामाध्यमातून मिळणार आहे. सध्याच्या इकॉनॉमी क्लासला ही सिस्टम रिप्लेस करेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. प्रवाशांमधलं अंतर कायम राहून आरामात प्रवास करण्याचा निराळाच अनुभव या माध्यमातून मिळणार आहे.

आरामदायी प्रवास शक्य

नवीन संकल्पना असलेल्या या डबल डेकर विमानाच्या सीटचे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. याचं डिझाइन केलेल्या अलेजांद्रोच्या मते, सीट्सच्या या रचनेमुळे इकॉनॉमी क्लासमधल्या प्रवाशांना आरामदायी प्रवास करणं शक्य होणार आहे. वरच्या सीटवर जाण्यासाठी पायऱ्या असणार आहेत. सीटवर गादी लावलेली असेल. जेणेकरून कम्फर्टनेस अधिक वाढेल. आपलं साहित्य ठेवण्यासाठी जास्तीची जागा उपलब्ध करून दिली जाईल. दोन वरच्या सीटच्या मध्ये खालची सीट असणार आहे, असं त्यानं सांगितलं.

खालची सीटही हवेशीर

खालची सीटदेखील अधिक आरामदायी करण्यात येईल. प्रवाशांना आपले पाय सहज पसरवता येतील. तर मागच्या प्रवाशांनाही कोणती अडचण यामुळे येणार नाही. म्हणजेच या सीटवर प्रवाशांना झोपण्यासाठीही आरामदायक स्थिती असणार आहे. हे ओव्हरहेड केबिनच्या जागेपासूनदेखील मुक्त होणार आहे. हे डिझाइन भविष्यात बोइंग 747 किंवा एअरबस ए-330 यासारख्या विमानांमध्ये तयार करण्यात येवू शकतं, असं डिझायनर असं अलेजांद्रोनं म्हटलंय. 

चार्जेस काय असतील?

प्रवाशांसाठी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे तिकीट दर. या नव्या रचनेमुळे तिकीट दराचा अतिरिक्त भार पडणार की आहे आधीच्या पद्धतीने तिकीटांची आकारणी होणार, याबाबत डिझायनर किंवा संबंधितांकडून कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही. मात्र इकॉनॉमी क्लासला समोर ठेवूनच ही संकल्पना मांडण्यात आलीय. म्हणजेच तिकीटांचा दर खूप जास्त असणार नाही, असा अंदाजही बांधला जात आहे.