Home Remedy keeps Many Diseases Bay : आजच्या धावपळीच्या युगात प्रत्येक घरातील एक सदस्य अॅसिडिटी, मधुमेह, लठ्ठपणा, हृदयविकाराच्या त्रासाने ग्रासला आहे. या आजारांवर उपचार करण्यासाठी डॉक्टरकडे जाऊन आपण प्रचंड पैसे खर्च करतो. मात्र आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, स्वयंपाक घरातील अत्यंत कमी किमतीच्या केवळ दोन पदार्थांचा उपयोग करुन, तुम्ही तुमचे हजारो रुपये कसे वाचवू शकता.
Table of contents [Show]
बहूगुणी पदार्थ
आपल्या स्वयंपाकघरात असलेले सैंधव मीठ आणि हिंग एकत्र सेवन केल्यास, अनेक आश्चर्यकारक फायदे आपल्याला मिळतात. औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेलं सैंधव मिठ आणि हिंग हे दोन पदार्थ बहूगुणी आहेत, असे आयुर्वेदातही सांगितले आहे.
पचनसंस्थेवरील उपाय
सैंधव मीठ आणि हिंग हे दोन्ही पदार्थ पचनसंस्थेसाठी अत्यंत फायदेशीर मानले जातात. या पदार्थांचे सेवन केल्याने पोटातील पाचक एंझाइम सक्रिय होतात. सैंधव मीठ आणि हिंग हे दोन्ही पदार्थ पाण्यात मिसळून उपाशी पोटी घेतल्यास पचनाशी संबंधित अनेक समस्या दूर होतात. तसेच पोटदुखीपासुनही आराम मिळतो.
मेटाबॉलीझम वाढविते
सैंधव मीठ आणि हिंग हे दोन्ही पदार्थ कोमट पाण्यात मिसळून पिल्यास, त्याचे दुप्पट फायदे होतात. हे पदार्थ शरीरातील मेटाबॉलीझम वाढवितात आणि मेटाबॉलीझम प्रक्रियेच्या मदतीने, अन्नाचे शरीरासाठी लागणाऱ्या उर्जेमध्ये रुपांतरित करतात.
धावपळीची जीवनशैली, वेळेवर जेवण न करणे, व्यायामाचा अभाव यामुळे लोकांची मेटाबॉलीझम क्रिया मंदावत आहे. त्यामुळे लोकांचा लठ्ठपणा आणि पचनाच्या समस्या वाढत आहेत. अशावेळी शरीरातील मेटाबॉलीझम वाढवण्यासाठी सैंधव मीठ आणि हिंग कोमट पाण्यात मिसळून प्यावे. यामुळे बद्धकोष्ठता आणि अपचनाच्या समस्या दूर होण्यास मदत होते.
अॅसिडिटी दूर करते
तसेच, अॅसिडिटीच्या समस्येनी ग्रासलेल्या लोकांना अपचन, जठरामध्ये आणि छातीमध्ये जळजळ यासारख्या गोष्टींमुळे नेहमीच त्रास होतो. तेव्हा यावेळी देखील सैंधव मीठ आणि हिंगाचा हा उपाय करुन बघावा. कारण अॅसिडिटीवरील महागडी औषध घेऊन अनेकदा केवळ तात्पुरता आराम लागतो.
अतिरीक्त कँलरी बर्न करते
सकाळी उपाशी पोटी सैंधव मीठ आणि हिंग घालून तयार केलेले पाणी शरीर शुद्धीकरणाचे कार्य करते. तसेच, हे पाणी शरीरातील अतिरीक्त कँलरी बर्न करुन वजन नियंत्रणात करण्यास मदत करते. तसेच, मधुमेह असणाऱ्यांनी देखील सकाळी उपाशी पोटी सैंधव मीठ आणि हिंग घालून तयार केलेले पाणी पिल्यास, रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते, झोप उत्तम येते आणि मधुमेह नियंत्रणात राहते.
50 रुपयाचा स्वस्त उपाय
बाजारात 30 रुपयाला 10 ग्रॅम हिंग आणि 20 रुपयाला एक लहान सैंधव मीठाचे पॅकेट मिळते. यामध्ये तुम्ही किमान एक आठवडा सैंधव मीठ आणि हिंगाचे पाणी करुन पिऊ शकता. त्यामुळे एक आठवड्यात केवळ 50 रुपयांमध्ये तुमच्या अनेक आजारांवरील औषध घरीच मिळते, असे म्हणायला हरकत नाही.