Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

फायद्याची गोष्ट : विमान कंपन्यांच्या स्पर्धेत तिकिटं होणार स्वस्त!

फायद्याची गोष्ट : विमान कंपन्यांच्या स्पर्धेत तिकिटं होणार स्वस्त!

Cheap Air Tickets : दिग्गज विमान कंपन्यांमध्ये जुलै-ऑगस्टमध्ये मोठी स्पर्धा सुरू होणार असून, विमान कंपन्यांच्या या स्पर्धेमुळे विमानांची तिकिटं स्वस्तात मिळण्याची शक्यता आहे.

येणाऱ्या काही दिवसांमध्ये विमान कंपन्यांमध्ये तिकिटांच्या दरावरून मोठं युद्ध पेटणार असल्याचं दिसून येत आहे. शेअर मार्केटमधील बिगशॉट गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांची अक्सा एअरलाईन्सची (akasa airlines) सेवा पुढील महिन्यात सुरू होण्याच्या तयारीत आहे. टाटा ग्रुपने एअर इंडिया (Air India) विकत घेतल्यानंतर टाटाही एअर इंडस्ट्रीमध्ये स्वत:चे पूर्वीचे स्थान निर्माण करण्यासाठी पूर्ण तयारीनिशी उतरला आहे. तर दुसरीकडे जेट एअरवेजनेही (Jet Air) आपली जुनी शान प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यामुळे सुमारे 3 वर्षांनतर विमान कंपन्यांमध्ये स्पर्धा पाहायला मिळणार आहे. या विमान कंपन्यांच्या स्पर्धेत विमान प्रवास स्वस्तात होण्याची शक्यता अधिक आहे.

अक्सा एअरचे सीईओ विनय दुबे यांच्या मत पुढील आठवड्यात होणाऱ्या अक्सा डीजीसीएच्या (DGCA) टेस्टसाठी तयार आहे. एव्हिएशन रेग्युलेटरचे सर्टीफिकेट मिळाळ्यावर पुढील महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत अक्साचे व्यावसायिक उड्डाण सुरू होण्याची शक्यता आहे.

जेट एअरवेजने शुक्रवारी कर्मचाऱ्यांची भरती सुरू केली. DGCA ने जेट एअरवेजला 20 मे रोजी एअर ऑपरेटर प्रमाणपत्र दिले होते. यामुळे जेटची हवाई सेवा पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. एकेकाही जेट एअरवेज ही देशातली सर्वात मोठी एअर कंपनी होती. ज्याचे बाजारातील भांडवल ही सर्वाधिक होते. पण कालांतराने कंपनीची आर्थिक बाजू कमकुवत होत गेली आणि शेवटी कंपनीला विमान सेवा बंद करावी लागली होती. पण आता पुन्हा एकदा जेट एअरवेज नव्या दमाने उतरली आहे.

एअर इंडिया कंपनीसुद्धा आपले जुने वैभव मिळवण्यासाठी कसून प्रयत्न करत आहे. एअर इंडिया आपल्या सेवा वाढवण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. त्यांनी नुकतेच 55 निवृत्त विमान पायलटांना नोकरीची ऑफर दिली. कंपनी येत्या काळात 300 नवीन विमानं खरेदी करण्याच्या तयारीत आहे.

एअर कंपन्यांमधील या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर जुलै-ऑगस्टमध्ये देशातील विमान कंपन्यांमध्ये तीव्र स्पर्धा पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेत ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी या विमान कंपन्या मोठमोठ्या डिस्काऊंट ऑफर देण्याची शक्यता आहे. याचा सर्वाधिक फायदा विमान प्रवाशांना होणार आहे.