अॅडव्हान्स टॅक्स भरण्यासाठी 15 सप्टेंबर 2023 ही डेडलाईन आहे. करदात्यांना ऑनलाईन आणि ऑफलाईन अॅडव्हान्स टॅक्स भरण्याची सुविधा आहे. मात्र आगाऊ कर भरण्याची डेडलाईन चुकली तर मात्र भुर्दंड भरावा लागेल.
आयकर सेक्शन 208 नुसार ज्या करदात्यांना टीडीएस वजा करता निव्वळ कर रक्कम 10 हजार रुपये किंवा त्याहून अधिक रक्कम भरावा लागतो अशा टॅक्सपेअर्सना अॅडव्हान्स टॅक्स भरता येतो. चार हप्त्यात अॅडव्हान्स टॅक्स भरता येतो. प्रत्येक तिमाहीतील शेवटच्या महिन्यातील 15 तारिख ही अॅडव्हान्स टॅक्ससाठी डेडलाईन आहे.
उच्च उत्पन्न गटातील वैयक्तिक करदाते, बिझनेसमन, प्रोफेशनल्स यांच्याकडून अॅडव्हान्स टॅक्स भरला जातो. अॅडव्हान्स टॅक्स म्हणजे जितके तुम्ही कमवता त्यासमोर कर भरणे असा आहे. आर्थिक वर्षाच्या शेवटी रिटर्न फायलिंग करताना टॅक्स भरण्यापेक्षा आगाऊ कर भरल्याने तो अॅडजस्ट होतो.
दरम्यान, विलंबाने कर विवरण सादर करणाऱ्या करदात्यांना जसे विलंब शुल्क भरावे लागते तसेच आगाऊ कर भरणाऱ्या टॅक्सपेअर्सला देखील डेडलाईन चुकल्यास दंड भरावा लागतो. आयकर सेक्शन 234 B आणि 234 C नुसार दर महिन्याला 1% दंडात्मक व्याज भरावे लागते. सेक्शन 234 B नुसार अॅडव्हान्स टॅक्स भरण्यास उशीर झाल्यास दंड आकारला जातो.
पहिल्या तिमाहीत 15 जूनपर्यंत 15% अॅडव्हान्स टॅक्स भरावा लागतो. दुसऱ्या तिमाहीत 15 सप्टेंबरपर्यंत 45% अॅडव्हान्स टॅक्स भरावा लागतो. 15 डिसेंबरपर्यंत 75% अॅडव्हान्स टॅक्स आणि 31 मार्चपर्यंत 100% अॅडव्हान्स टॅक्सचे पेमेंट होणे आवश्यक आहे.