Contribution by Gautam Adani: भारतात करोना काळात अर्थव्यवस्था कशीबशी रांगत होती. टाळेबंदी उठल्यानंतर, निर्बंध शिथील झाल्यावर जागतिक अर्थव्यवस्था कोलमडू लागली तिथे भारताच्या अर्थव्यवस्थेत लक्षणीय वाढ झाली आहे. युकेला मागे टाकून, भारत  जगातील पाचव्या क्रमांकाचा देश बनला आहे. याचाच अर्थ जगातील सर्वात मोठी पाचवी इकॉनॉमी भारताची आहे. हे सर्व साध्य करण्यामागे गौतम अदानी यांचे मोठे योगदान आहे.
2008 नंतर प्रथमच, अदानींनी एवढी मोठी उंची गाठली आहे. त्यांची संपत्ती 2021 च्या तुलनेत तीन पटींनी वाढली आहे. फोर्ब्सच्या अहवालानुसार, 2022 मध्ये त्यांची संपत्ती 150 अब्ज इतकी वाढ असून, ते जगातले दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.
गौतम अदानी यांचे नेटवर्थ 12 लाख 11 हजार 460 कोटी रुपये आहे. देशातले मोठे, गुजरातमध्ये असलेले मुंद्रा बंदर त्यांच्या मालकीचे आहे. पुढील 10 वर्षात ते विविध उद्योगांसाठी 100 अब्ज गुंतवणावर आहेत. यापैकी 70 टक्के रक्कम ते अक्षय ऊर्जा निर्मितीसाठी वापरणार आहे, असे वक्तव्य जयपूर येथे नुकतेच इन्व्हेस्ट राजस्थान समीट पार पडले तेथे अदानी समुहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी म्हटले. 
भारतीय शेअर बाजारातील एका वर्षापूर्वीची सर्वात मोठी घसरण रुपयाची कमी होती, जी त्या काळात 10% घसरली. तरीही, भारतातील सर्वोच्च 100 कमाई करणाऱ्यांची एकूण संपत्ती 25 अब्जने वाढून 800 अब्ज झाली आहे. अदानी एंटरप्रायझेसच्या वार्षिक महसुलात तब्बल 117 टक्क्यांची वाढ झाली आहे. यामुळे 469.46 कोटींची भर पडली आहे. अदानी उद्योग समुह, भारताच्या जीडीपीमध्ये (GDP) अर्थात सकल देशांतर्गत उत्पादनात 18 टक्के परिणाम करते. तर, भारतीय शेअर बाजाराच उंचावलेला ग्राफ यामागे अदानी समुहाचे मोठे योगदान आहे, म्हणूनच आज जागतिक मंदीच्या काळात भारताचे आर्थिक आलेख उंचावत चालला आहे, असे वर्ल्ड काँग्रेस ऑफ अकाऊंटटने त्यांच्या 2022 च्या अर्थ अहवालात म्हटले आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी हे भारतातील सर्वात श्रीमंत लोकांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांची सध्याची एकूण संपत्ती 88 अब्ज आहे. ही संपत्ती 2021 वर्षाच्या तुलनेत 5 टक्क्यांनी घटली आहे. अंदाजानुसार, देशातील सर्वात श्रीमंत लोकांची एकत्रित संपत्ती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्याकडे 30 टक्के इतकी आहे.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            