Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Adani Enterprises FPO: 27 जानेवारीला अदानी एंटरप्राईजचा एफपीओ बाजारात, काय आहे फ्लोअर किंमत?

www.valueresearchonline.com

Adani Enterprises FPO: बहुप्रतिक्षित अदानी एंटरप्रायझेसचा एफपीओ 27 जानेवारी रोजी लाँच होणार आहे. 3 हजार 112 रुपये ते 3 हजार 276 रुपये प्रति शेअर किंमत बँड आहे. तर बाजार भावापेक्षा किती डिस्काऊंटने शेअर मिळतील हे या बातमीतून समजून घ्या.

Adani Enterprises FPO offer: भारतीय शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठा एफपीओ अदानी एंटरप्रायझेस लाँच करणार आहे. अदानी समुहाचा मल्टीबॅगर स्टॉक अदानी एंटरप्रायझेसची फॉलो-ऑन ऑफर ( (FPO: Follow-On Public Offer)) 27 जानेवारी 2023 रोजी सुरू होणार आहे. गुंतवणुकदारांना 31 जानेवारीपर्यंत एफपीओमध्ये अर्ज करता येणार आहे. कंपनी एफपीओच्या माध्यमातून बाजारातून 20 हजार कोटी रुपये उभारणार आहे. किरकोळ गुंतवणूकदारांना सवलतीच्या दराने शेअर्स जारी केले जातील. किरकोळ गुंतवणूकदारांना प्रति समभाग 10 टक्के सूट देऊन शेअर्स ऑफर केले जातील असे मानले जाते.

प्राइस बँडची घोषणा (Announcement of price band)

अदानी एंटरप्रायझेसनेही एफपीओचा प्राइस बँड जाहीर केला आहे. कंपनीने 3 हजार 112 रुपये ते 3 हजार 276 रुपये प्रति शेअर किंमत बँड निश्चित केला आहे. लोअर बँडवर 13.5 टक्के सूट दिली जात आहे. तर किरकोळ गुंतवणूकदारांना 64 रुपयांची स्वतंत्र सूट दिली जाणार आहे. अँकर गुंतवणूकदार 25 जानेवारी 2023 रोजी अदानी एंटरप्रायझेसच्या एफपीओमध्ये अर्ज करू शकतील. कंपनी अंशतः सशुल्क आधारावर समभाग जारी करेल. कंपनी अदानी एंटरप्रायझेसच्या एफपीओमध्ये ज्या किरकोळ गुंतवणूकदारांना शेअर्स वाटप केले जातील त्यांना दोन किंवा तीन हप्त्यांमध्ये रक्कम भरण्यास सांगू शकते, रिलायन्स इंडस्ट्रीजच्या राइट्स इश्यूमध्येही असेच झाले होते. एफपीओमध्ये 35 टक्के कोटा किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव असेल.

एफपीओद्वारे उभारलेल्या रकमेपैकी 4 हजार 170 कोटी रुपये कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरले जाणार आहे. यासोबतच कंपनी उर्वरित रक्कम आपल्या विस्तार योजनेवर खर्च करणार आहे. अदानी एंटरप्रायझेसच्या एफपीओनंतर कंपनीतील प्रवर्तकांचा हिस्सा 3.5 टक्क्यांनी खाली येणार आहे, ही माहिती कंपनीने एफपीओबाबत घोषणा करताना सांगितली होती. सप्टेंबर 2022 च्या आकडेवारीनुसार, कंपनीतील प्रवर्तकांचा हिस्सा 72.63 टक्के होता. एलआयसीकडे (LIC) 4.03 टक्के हिस्सेदारी आहे. याशिवाय नोमुरा सिंगापूर (Nomura Singapore), एपीएमएस इन्व्हेस्टमेंट फंड (APMS Investment Fund), इलारा इंडिया अपॉर्च्युनिटीज फंड (Elara India Opportunities Fund) यांचा कंपनीत सुमारे 1 ते 2 टक्के हिस्सा आहे. मोठे विदेशी गुंतवणूकदार अदानी एंटरप्रायझेसच्या फॉलो-ऑन ऑफरमध्ये गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहेत, ज्यात संयुक्त अरब अमिरातीची (Arab Emirates) ही इंटरनॅशनल होल्डिंग कंपनी, अबू धाबी गुंतवणूक प्राधिकरण (Abu Dhabi Investment Authority), कतार गुंतवणूक प्राधिकरण (Qatar Investment Authority) यांचा समावेश आहे.

एफपीओच्या घोषणेनंतर शेअर्स पडले (Shares fell after the FPO announcement)

एफपीओ सादर होण्याची तारीख घोषित झाल्यानंतर, बुधवारी 18 जानेवारी रोजी ट्रेडिंग सत्रात अदानी एंटरप्रायझेसच्या शेअरवर दबाव दिसून आला, शेअर 1.17 टक्क्यांच्या घसरणीसह 3 हजार 596 रुपयांवर बंद झाला. तथापि, अलिकडच्या वर्षांत अदानी एंटरप्रायझेस हा बाजारातील सर्वात मोठा मल्टीबॅगर स्टॉक आहे ज्याने गुंतवणुकदारांना 16 पट परतावा दिला आहे.